राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथील बड्या कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश! अजूनही कार्यकर्ते भाजपच्या गळाला लागण्याची शक्यता?

अहमदनगर जिल्ह्यामध्ये अगदी तळागाळातील कार्यकर्त्यांवर लक्ष दिले जात असून कार्यकर्त्यांना देखील जो तो पक्ष आपल्याकडे खेचण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे व याचाच अनुभव राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथील गाडकवाडी परिसरातील  कार्यकर्त्यांच्या दोन गटांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या निमित्ताने आले.

Ajay Patil
Updated:
kardile and tanpure

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय पटलावर मोठ्या प्रमाणावर राजकीय घटना घडायला लागल्या असून अगदी खालच्या फळीतील कार्यकर्त्यांपासून तर तालुका ते जिल्हास्तरीय नेत्यांमध्ये आता विधानसभा निवडणुकीबाबत उत्सुकता लागली असून अनेक जण आता कामाला देखील लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक राजकीय घडामोडींना वेग आल्याचे आपण बघत आहोत.

अगदी याच पद्धतीने जर आपण अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण पाहिले तर ते अगदी तळागाळापासून ढवळून निघत आहे की काय असे आपल्याला दिसून येत आहे.

अहमदनगर जिल्ह्यामध्ये अगदी तळागाळातील कार्यकर्त्यांवर लक्ष दिले जात असून कार्यकर्त्यांना देखील जो तो पक्ष आपल्याकडे खेचण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे व याचाच अनुभव राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथील गाडकवाडी परिसरातील  कार्यकर्त्यांच्या दोन गटांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या निमित्ताने आले.

 ताहाराबाद येथील बड्या कार्यकर्त्यांचे दोन गट भाजपात

राहुरी तालुक्याती ताहाराबाद येथील गाडकवाडी परिसरातील कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याच्या दोन दिवसानंतरच पुन्हा गावातील दुसऱ्या गटानेही जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते भाजपामध्ये पक्ष प्रवेश केल्याने आ. प्राजक्त तनपुरे यांच्या गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.ताहाराबादचे माजी ग्रा.पं. सदस्य तसेच चर्मकार संघटनेचे अध्यक्ष किरण घनदाट,

दत्तात्रय नालकर, संजय शिंदे, दौलत नालकर, गणेश शिंदे, ज्ञानेश्वर वरघुडे, सूरज कदम, सतिष विधाते, रावसाहेब विधाते, श्रीकांत लाहुंडे, दादा शिंदे, मच्छिद्र शिंदे, गोरख कुटे आदींनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते राहुरी येथे पक्ष प्रवेश केला. माजी आ. कर्डिले यांनी सर्वांचे स्वागत करून सांगितले की, भाजपा हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे.

संघटनेत प्रामाणिक काम करणाराला नक्की संधी आहे. ताहाराबाद येथील गाडकवाडी व गावातील दोन गट आमच्याकडे आले आहेत. त्यांचा मान, सन्मान केला जाईल. सर्वांनी एकजुटीने आगामी निवडणूकीत काम करावे, असे सांगितले. दरम्यान, ताहाराबाद येथील दोन गट भाजपात आल्याने

आमदार प्राजक्त तनपुरे गटाला धक्का 

आ. प्राजक्त तनपुरे यांच्या गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. आगामी काळात तनपुरे गटाला अजूनही धक्के देण्याच्या तयारीत काही बडे कार्यकर्ते असल्याचे बोलले जात आहे. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुरेशराव बानकर, जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे, युवा मोर्चा अध्यक्ष धिरज पानसंबळ,

माजी संचालक रविंद्र म्हसे, माजी सरपंच नारायण झावरे, सुनील औटी, भानुदास वाबळे, हरिभाऊ औटी, विलास कुटे, सुनिल झावरे, बाबासाहेब किनकर, गणेश घनदाट, वैभव झावरे, बापू औटी, मयूर गवळी, सोमनाथ आहेर, मारुती नालकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe