Longest Tunnel:- महाराष्ट्रामध्ये अनेक रस्ते प्रकल्प, रेल्वे व मेट्रो प्रकल्पांची कामे सध्या प्रगतीपथावर असून या प्रकल्पांच्या उभारणीमुळे अनेक ठिकाणचे प्रवासाचे अंतर कमालीचे कमी होण्यास मदत होणार असून प्रवाशांचा वेळ आणि पैसा देखील वाचणार आहे. तसेच या प्रकल्पांमध्ये अत्याधुनिक असे तंत्रज्ञान वापरण्यात आल्याने अनेक ठिकाणी मोठमोठे उड्डाणपूल तसेच बोगदे तयार करण्यात आले असून या माध्यमातून अंतर हे कमीत कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.
अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण माथेरान डोंगरात खोदण्यात आलेला बडोदा जेएनपीटी महामार्गावर असलेल्या महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा बघितला तर तो देखील एक महत्वपूर्ण बोगदा असून यामुळे बदलापूर ते मुंबई व बदलापूर ते पनवेल हा प्रवास पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ खूप कमी होणार आहे.
जवळपास 15 महिन्याच्या कालावधीत या बोगद्याचे काम आता पूर्ण करण्यात आले असून नवी मुंबई आणि बदलापूर यादरम्यानची कनेक्टिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणावर सुधारायला मदत झाली आहे.
माथेरान डोंगरा खालून उभारला गेला आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा
बडोदा जेएनपीटी महामार्गावर महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा तयार करण्यात आला असून हा माथेरान डोंगरांमध्ये खोदण्यात आला आहे. जवळपास बदलापूर ते पनवेल असा सव्वाचार किलोमीटर लांबीचा हा बोगदा पंधरा महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्यात आला असून 22 मीटर रुंद असलेल्या या बोगदाच्या चार मार्गीका असणार आहेत.
या बोगद्यामुळे बदलापूर ते पनवेल हा प्रवास फक्त दहा मिनिटांमध्ये तर बदलापूर ते मुंबई हा प्रवास अटल सेतू मार्गे 30 ते 40 मिनिटात करता येणे शक्य होणार आहे. एवढेच नाही तर या महामार्गामुळे जेएनपीटी बंदर येथून जे वाहने जातील त्यांना बदलापूर मार्गे समृद्धी महामार्ग आणि इतकेच नाही तर दिल्ली वडोदरा महामार्गाला देखील कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
या बोगद्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा फायदा असा होणार आहे की यामुळे पनवेल तसेच तळोजा व कल्याण मार्गावर जी काही वाहतूक कोंडी किंवा वाहतुकीचा ताण येतो तो कमी होण्यास मदत होणार आहे.
या बोगदाचे काम सध्या 80 टक्के पूर्ण झाले असून या ठिकाणी असलेल्या दुसऱ्या बोगद्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात या दुसऱ्या बोगद्याचे काम देखील पूर्ण होण्याची शक्यता असून या दोन्ही बोगद्यांची मध्यभागांची उंची 13 ते 22 मीटर इतकी आहे.
माथेरानच्या डोंगराखालून निघणार दिल्लीचा बोगदा
जगातील सर्वात लांब म्हणून ओळखला जाणाऱ्या 1350 किमी दिल्ली ते मुंबई या एक्सप्रेसवेचे काम सध्या सुरू असून या एक्सप्रेस वे वरील माथेरान डोंगराखालून दिल्लीचा बोगदा निघणार असून त्यामुळे मुंबईहून बारा तासात दिल्ली गाठणे शक्य होणार आहे. दिल्ली ते जेएनपीटी बंदराला जोडणाऱ्या १३५० किमीच्या मार्गाचे काम सुरू होणार असून याकरिता माथेरानच्या जो काही इको सेन्सेटिव्ह झोन आहे
त्या डोंगर रागांमधून 4.39 किमीचा आठ पदरी बोगदा लवकरच खोदला जाणार आहे. हा बोगदा पनवेल जवळ माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या मोरबे गावापासून सुरू होणारा असून ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ जवळ असलेल्या भोज या गावापर्यंत असणार आहे. साधारणपणे या बोगद्यासाठी 1453 कोटींचा खर्च होणार आहे व यामुळे दिल्ली ते मुंबई हे 24 तासांचे अंतर निम्म्याने कमी होऊन 12 तासांवर येणार आहे.