Tractor Update:- शेतीमध्ये जे काही मोठ्या प्रमाणामध्ये यांत्रिकीकरण झाले त्यामध्ये ट्रॅक्टर या यंत्राचा फार मोठा वाटा आहे. शेतीमध्ये प्रत्येक कामात शेतकऱ्यांसोबत खांद्याला खांदा लावून उभे राहणारे यंत्र म्हणजे ट्रॅक्टर असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
पीक लागवडी अगोदरची पूर्व मशागत असो की अंतर मशागत आणि पीक काढणीनंतर बाजारपेठेत शेतीमाल पोचवण्यासाठी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरची खूप मोठी मदत होत असते. त्यामुळे शेतकरी बंधू मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर खरेदी करत असतात.
बाजारपेठेमध्ये ट्रॅक्टरचा विचार केला तर अनेक नामांकित कंपन्या असून प्रत्येक कंपन्यांचे वेगवेगळे ट्रॅक्टर्स मॉडेल्स प्रसिद्ध आहेत. यामध्ये प्रामुख्याने स्वराज्य ट्रॅक्टर्स हे ट्रॅक्टर मधील एक प्रसिद्ध असे नाव असून शेतकऱ्यांच्या पसंतीचे असे ट्रॅक्टर आहे.
विशेष म्हणजे सुप्रसिद्ध क्रिकेट खेळाडू आणि कॅप्टन कूल म्हणून ओळखले जाणारे महेंद्रसिंग धोनी देखील स्वराज ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. महेंद्रसिंग धोनी हे स्वराज्याचे स्वराज 855 FE हे ट्रॅक्टर चालवताना दिसले होते. नेमके हे ट्रॅक्टर कसे आहे व ते शेतकऱ्यांसाठी कसे फायद्याचे आहे? ट्रॅक्टरची किंमत काय? त्याबद्दल माहिती घेऊ.
स्वराज 855 FE ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये
विशेष म्हणजे या ट्रॅक्टरला सहा वर्षाचा वारंटी पिरेड देण्यात आलेला असून यामध्ये कंटेम्पररी स्टाईल आणि आडहान्स फिचरचा कॉम्बो देण्यात आलेला आहे. शेतीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर याचं पावर आणि परफॉर्मन्स शेतीसाठी खूप महत्त्वाचा आहे.
त्यामुळे शेतीचे संबंधित सर्व कामे किंवा टास्क हे ट्रॅक्टर सहजपणे हँडल करते. हे तीन सिलेंडर ट्रॅक्टर असून हे ट्रॅक्टर 29.82-37.28 kW वर 41-50 hp पावर जनरेट करते. कंपनीच्या माध्यमातून या ट्रॅक्टरमध्ये 2000 रेटेड पॉवरफुल इंजिन वापरले गेले असून मजबुती करिता यामध्ये पुढच्या बाजूला मजबूत असे एक्सेल देण्यात आलेले आहे.
रात्रीच्या वेळेस चांगली दृश्यमानता राहावी याकरिता एलईडी लाईट हे मजबुत अशा फेंडर सोबत देण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे एका वेळी तुम्ही या ट्रॅक्टरमध्ये 62 लिटर डिझेल भरू शकतात.
किती आहे या ट्रॅक्टरची किंमत?
हा ट्रॅक्टर सहा वर्षाच्या स्टॅंडर्ड वारंटी सोबत मिळतो व याची किंमत सहा लाख नऊ हजार( एक्स शोरूम ) ते नऊ लाख 95 हजार( एक्स शोरूम) इतकी आहे. स्वराज्य ट्रॅक्टरने क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांची ब्रँड अँबेसिडर म्हणून देखील निवड केलेली आहे.