Land Record:- एखाद्या जमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार करायचा असेल तर तो खूप काळजीपूर्वक करणे गरजेचे असते. प्रामुख्याने जी व्यक्ती जमीन खरेदी करत असते त्याने प्रत्येक गोष्टीत काळजी घेणे खूप गरजेचे आहे. कारण बऱ्याचदा आपल्या वाचण्यात किंवा ऐकण्यात येते की जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये फसवणुकीच्या घटना घडतात.
एकच जमिन एकापेक्षा जास्त व्यक्तींना विक्री केली जाते तसेच बनावट कागदपत्र तयार करून देखील जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार पार पाडले जातात. अशा अनेक घटना आपल्याला घटना दिसून येतात. जमीन असो की प्लॉट खरेदी विक्री व्यवहारांमध्ये काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे असते.
त्यामुळे आपण जी काही जमीन किंवा प्लॉट खरेदी करत आहोत त्या जमिनीचे संपूर्ण माहिती आपल्याकडे कागदपत्रांसहित असणे गरजेचे आहे. त्याकरिता आपल्याकडे त्या जमिनीचे जुने कागदपत्र उपलब्ध असणे खूप महत्त्वाचे आहे. यावरून आपल्याला त्या जमिनीचा खरा मालक किंवा त्या जमिनीच्या अगोदर झालेले सगळे व्यवहार आपल्याला माहीत असणे देखील तितकेच गरजेचे आहे.
परंतु तुम्हाला त्या जमिनीच्या बाबतीत असलेली संपूर्ण माहिती किंवा जुनी कागदपत्रे हवी असतील तर ती नेमकी कुठे मिळतील? हा देखील एक मोठा प्रश्न आहे. परंतु आता या इंटरनेटच्या युगामध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील जमिनीच्या बाबतीतली सगळी माहिती व जुनी कागदपत्रे काढू शकतात.
या पद्धतीने तुम्ही काढू शकतात जमिनीची जुनी कागदपत्रे
याकरिता तुम्हाला महसूल विभागाची जी काही अधिकृत वेबसाईट आहे त्यावर जाऊन संबंधित जमिनीचे संपूर्ण माहिती काढता येणे शक्य आहे. महसूल विभागाच्या वेबसाईटचा वापर करून तुम्ही जमिनीचा नकाशा पासून, जमिनीचे पत्रक व इतर महत्त्वाची कागदपत्रांच्या नोंदी देखील तपासू शकतात. त्याकरिता तुम्हाला या स्टेप्स फॉलो करणे गरजेचे आहे….
1- सगळ्यात अगोदर तुम्हाला राज्य महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाणे गरजेचे आहे.
2- या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला जिल्हा व तालुक्याचे नाव निवडावे लागेल.
3- त्यानंतर तुम्हाला ज्या गावच्या जमिनी विषयी माहिती जाणून घ्यायची आहे त्या गावाचे नाव नमूद करावे.
4- त्यानंतर समोर जे पर्याय दिसतील त्या पर्यायामधून तुम्हाला खातेधारकांच्या नावाने शोधा या पर्यायाची निवड करावी लागेल.
5- त्यानंतर जमीन मालकाच्या नावाचे पहिले अक्षर टाकून शोधा या बटणावर क्लिक करावे.
6- त्यानंतर तुम्हाला जे नाव दिसतील त्यातून तुम्हाला हवे असलेल्या जमीन मालकाचे नाव निवडावे.
7- त्यानंतर आलेला कॅपचा कोड टाकावा.
8- कॅपच्या कोड टाकल्यानंतर संबंधित खाते क्रमांक किंवा गट क्रमांक चा संपूर्ण तपशील तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतो.
9- यामध्ये तुम्ही खसरा क्रमांक म्हणजेच गट क्रमांक पासून त्या जमिनीचा संपूर्णपणे तपशील पाहू शकतात. एवढेच नाही तर संबंधित खातेधारकाच्या नावावर किती जमीन आहे हे देखील तुम्हाला कळते.
अशा पद्धतीने तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने संबंधित जमिनीचा संपूर्ण इतिहास पाहू शकतात व होणाऱ्या फसवणुकीपासून स्वतःला वाचवू शकतात.