Lumpy Skin Disease : लंपी आजाराचा महाराष्ट्रात शिरकाव! ‘या’ घरगुती उपचाराने बरा होणार लंपी आजार

Ajay Patil
Published:
maharashtra breaking

Lumpy Skin Disease : मित्रांनो देशातील अनेक राज्यांमध्ये गायी आणि म्हशींमध्ये लंपी आजाराचा मोठा प्रादुर्भाव बघायला मिळत आहे. आता महाराष्ट्रात देखील लंपी आजाराचा शिरकाव झाला असल्याने राज्यातील पशुपालक शेतकरी बांधवांची (Livestock Farmer) काळजी देखील वाढली आहे.

मित्रांनो हा आजार पशुमध्ये (Animal Care) होणारा एक प्रमुख त्वचारोग असून हा एका विषाणूमुळे होतो. हा एक पशूमध्ये होणारा प्रमुख संसर्गजन्य रोग असल्याने याबाबत पशुपालक शेतकरी बांधवांना (Farmer) अधिक सजग राहण्याचे आवाहन यावेळी केले जात आहे.

या आजारामुळे गुजरात, राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये हजारो गुरे मरण पावली आहेत. आता महाराष्ट्रात देखील या आजाराने थैमान मजवायला सुरवात केली आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, या आजाराने मृत पावलेल्या जनावरांमध्ये गायींचा वाटा हा सर्वाधिक आहे.

अशा परिस्थितीत गाय पालन (Cow Rearing) करणाऱ्या शेतकरी बांधवांना अधिक काळजी घेण्याचे आवाहन जाणकार लोकांकडून केले जात आहे. लम्पी त्वचा रोग हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे जो वेगाने पसरतो आणि विशेषत: कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या गायींना (Cow Disease) प्रभावित करतो.

या आजारावर कोणतेही ठोस उपचार नसल्यामुळे, केवळ लस या आजारावर नियंत्रण आणि प्रतिबंध करू शकते. तथापि, पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, लंपी रोगाची लागण झालेल्या गायी आणि म्हशींना काही देशी आणि आयुर्वेदिक उपायांनीही बरे करता येते. अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी लंपी आजारावर घरगुती उपचाराने (lumpy disease treatment) कशा पद्धतीने नियंत्रण मिळवले जाऊ शकते याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने या पशुसाठी घातक ठरत असलेल्या त्वचेच्या आजारासाठी पारंपारिक उपचार पद्धती निर्धारित केल्या आहेत. बोर्डाने केलेल्या दाव्यानुसार, गाईला संसर्ग झाल्यास हे पारंपरिक उपायही केले तर बऱ्यापैकी आराम मिळू शकतो.

मात्र असे असले तरी पशुपालक शेतकरी बांधवांनी रोगग्रस्त जनावरांना निरोगी जनावरांपासून पूर्णपणे वेगळे ठेवले पाहिजे. हा संसर्गजन्य रोग असल्याने निरोगी पशु देखील संक्रमित पशूंच्या संपर्कात आल्यास अशा पशूंना या रोगाची लागण होऊ शकते. अशा परिस्थितीत निरोगी प्राण्यांना लंपी आजाराने संक्रमित असलेल्या जनावराजवळ जाऊ देऊ नका किंवा निरोगी प्राण्यांना संक्रमित पशूंचे उरलेले पाणी किंवा चारा खाऊ देऊ नका.

लंपी या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी घरगुती उपचार पद्धती

पहिल्या पद्धतीचे साहित्य- 10 सुपारीची पाने, 10 ग्रॅम काळी मिरी, 10 ग्रॅम मीठ आणि आवश्यकतेनुसार गूळ, हे संपूर्ण साहित्य बारीक करून पेस्ट तयार करा आणि आवश्यकतेनुसार त्यात गूळ घाला. हे मिश्रण जनावरांना थोड्या-थोड्या प्रमाणात खायला द्या. पहिल्या दिवशी, दर तीन तासांनी जनावरांना एक डोस द्या. दुसऱ्या दिवसापासून दुसऱ्या आठवड्यापर्यंत, दिवसातून फक्त 3 डोस द्या. मात्र प्रत्येक डोस हा ताजा तयार करावा.

दुसरी पद्धत

जखमेवर लावायचे मिश्रण तयार करा

साहित्य – 1 मूठभर मेथीची पाने, 10 पाकळ्या लसूण, 1 मूठ कडुनिंबाची पाने, 1 मूठभर मेंदीची पाने, 500 मिली नारळ किंवा तीळ, 20 ग्रॅम हळद, 1 मूठभर तुळशीची पाने

तयार करण्याची पद्धत- सर्व साहित्य बारीक करून पेस्ट बनवा. यानंतर त्यात खोबरेल किंवा तिळाचे तेल टाकून ते उकळून थंड करा,

या पद्धतीने वापरा- आता गाईची जखम साफ केल्यानंतर हे थंड मिश्रण थेट जखमेवर लावा. तसेच, जखमेत किडे दिसल्यास, प्रथम कापूर खोबरेल तेलात मिसळून लावा. किंवा सीताफळची पाने बारीक करून पेस्ट बनवा आणि जखमेवर लावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe