अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! महाडिबीटी ट्रॅक्टर अनुदानाची दुसरी यादी जाहीर ; येथे दिलेल्या PDF मध्ये आपले नाव चेक करा

Ajay Patil
Published:
maha-dbt

Maha-DBT : मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे महाराष्ट्र राज्य शासनाकडून शेतकरी बांधवांना अनुदानावर ट्रॅक्टर, पावर टिलर, ट्रॅक्टर/पावर टिलर चलित यंत्र, अनुदानावर उपलब्ध करून दिले जातात. यासाठी लॉटरीचा उपयोग करून सोडत दिली जाते. आता महाडीबीटी पोर्टलवर अनुदानासाठी अर्ज केलेल्या ज्या शेतकरी बांधवांना लॉटरी लागली आहे त्यांची यादी सार्वजनिक करण्यात आली आहे.

मित्रांनो कृषी उपकरणांसाठी अनुदानाचा लाभ घेणे हेतू अर्ज केलेल्या ज्या शेतकरी बांधवांची 6 नोव्हेंबर 2022 पर्यंत लॉटरी लागली आहे अशा शेतकरी बांधवांची यादी समोर आली आहे. मित्रांनो विशेष म्हणजे आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील ज्या शेतकरी बांधवांची अनुदानासाठी लॉटरी लागली आहे त्यांची नावे जाणून घेणार आहोत. मित्रांनो लॉटरी मध्ये नाव आल्यानंतर संबंधित लॉटरी लागलेल्या शेतकरी बांधवांना आपले आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, तसेच ज्या अवजारासाठी लॉटरी लागली आहे त्याचे कोटेशन, नमुना नंबर आठ तसेच सातबारा उतारा महाडीबीटी पोर्टलवर अपलोड कराव लागणार आहे.

ही सदर कागदपत्रे अपलोड केल्यानंतर कृषी अधिकाऱ्याकडून सदर कागदपत्रांची शहानिशा किंवा व्हेरिफिकेशन केले जाते. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की कृषी अधिकाऱ्याकडून सदर अपलोड केलेले कागदपत्रे यथायोग्य असल्यास पूर्वसंमती बहाल केली जाते. पूर्वसंमती बहाल झाल्यानंतर संबंधित शेतकरी बांधवांना त्या यंत्राची खरेदी पावती GST बिलासह महाडीबीटी पोर्टल वर अपलोड करावी लागते.

सदर खरेदी पावती यथायोग्य असल्यास त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे धांदली नसल्यास सदर संबंधित शेतकरी बांधवांना अनुदानासाठी पात्र केले जाते आणि अनुदान त्यांच्या खात्यावर वर्ग केले जाते. मित्रांनो लॉटरी मध्ये नाव आल्यानंतर सदर शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करून कागदपत्रे अपलोड करावी.

यासाठी शेतकरी बांधव आपल्या जवळच्या आपले सेवा केंद्रावर जाऊन देखील कागदपत्रे अपलोड करू शकतात. किंवा शेतकरी बांधव स्वतः लॉगिन घेऊन कागदपत्रे अपलोड करू शकणार आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील लॉटरी लागलेल्या शेतकऱ्यांची नावे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा :- click here

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe