Maharashtra Mansoon Update: राज्यातील जनता गेल्या काही दिवसापासून मान्सूनची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे. शेतकरी बांधव (Farmer) अगदी चातकाप्रमाणे मान्सूनची प्रतीक्षा करत आहेत.
मात्र मान्सून (Mansoon) महाराष्ट्रात सध्या हुलकावणी देत असल्याने शेतकऱ्यांसमवेत उकाड्याने हैराण झालेली जनता चिंतातूर असल्याचे बघायला मिळतं आहे.

खरं पाहता, दरवर्षी 1 जूनला दाखल होणारा मान्सून यावर्षी 29 मे ला केरळ मध्ये म्हणजे वेळेआधीच दाखल झाला होता मात्र त्या नंतर मान्सूनच्या प्रवासाला पोषक वातावरण न राहिल्याने मान्सून कर्नाटकात येऊन बराच काळ विश्रांती घेत होता.
दरम्यान आता मान्सून (Mansoon 2022) गोव्याच्या वेशीत असल्याचे सांगितले जात असून त्याचा प्रवास हा संथ गतीने सुरु आहे. मात्र असे असताना राज्यातील अनेक भारतात मान्सूनपूर्व पाऊस (Pre-Mansoon Rain) पडत आहे.
दरम्यान भारतीय हवामान विभागाने (IMD) कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता देखील वर्तवली आहे.
यामुळे तूर्तास तरी उकाड्याने हैराण झालेल्या जनतेस उष्णतेपासून आराम मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.मान्सून राज्यात उशिरा दाखल होणार असला तरी देखील मान्सूनपूर्व पावसाने राज्यात जोरदार हजेरी लावली आहे.
एवढेच नाही राज्यातील अनेक भागात वादळी वारे देखील वाहत आहेत. पूर्वमोसमी पावसाला सध्या पोषक हवामान असल्याने राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तूरळक ठिकाणी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) वर्तवण्यात आली आहे.
मात्र विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. यामुळे राज्यात सध्या विरोधाभासी वातावरण बघायला मिळत आहे. आपल्या राज्यात ढगाळ हवामान तयार होत असून मध्य कोकण महाराष्ट्र, मराठवाड्यात विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने सार्वजनिक केला आहे.
खरं पाहता, मान्सून महाराष्ट्राच्या दक्षिण कोकणात किंवा तळकोकणात सात जूनच्या सुमारास दाखल होत असतो. परंतु यावर्षी 7 जून ओलांडली तरी देखील मान्सून हा कोकणात दाखल झालेला नाही.
मात्र असे असले तरी हवामान विभागाने कोकणात वादळी वाऱ्यासहं पूर्वमोसमी पावसाची शक्यता वर्तवली आहे. वादळी वाऱ्याचा वेग ताशी 60 किलोमीटर राहणार असल्याने समुद्रात मासेमारीस जाऊ नये असा इशारा देखील यावेळी करण्यात आला आहे.
8 जून ते 10 जून या कालावधीत वादळी वाऱ्यासह पूर्व मोसमी पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड इत्यादी किनारी भागांत 8 जूनपासून विजांच्या कडकडाटांसह सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.