Mansoon Rain: पाऊस आला रे….!! देशातील ‘या’ भागात पुढील पाच दिवस धो-धो बरसणार पाऊस; IMD चा ताजा अंदाज

Published on -

Weather Update: मित्रांनो देशाची राजधानी दिल्ली (Delhi Weather Update) आणि एनसीआरमध्ये (NCR) सोमवारी संध्याकाळी अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाला यामुळे देशातील अनेक भागाच्या हवामानात मोठा लक्षणीय बदल (Climate Change) झाला आहे.

यामुळे दिल्ली, हरियाणासह काही राज्यांमध्ये उकाड्याने त्रस्त असलेल्या जनतेस मोठा आराम मिळाला आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) उत्तर बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, गोव्याच्या विविध भागात पावसाचा इशारा दिला आहे.

यासह, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मंगळवारी सांगितले की नैऋत्य मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी परिस्थिती पूर्णपणे अनुकूल आहे. पुढील 2 ते 3 दिवसांत नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागांमध्ये, केरळचा उर्वरित भाग, तामिळनाडू, कर्नाटक आणि ईशान्य राज्यांच्या आणखी काही भागात पुढे जाण्याची दाट शक्यता आहे.

मान्सूनमुळे (Mansoon) केरळ, माहे, लक्षद्वीप, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये पुढील पाच दिवसांत पाऊस पडण्याची (Mansoon Rain) शक्यता आहे. तसेच, 2 आणि 3 जून रोजी किनारपट्टी आणि दक्षिण कर्नाटकात पावसाची शक्यता आहे. 

येत्या पाच दिवसांत नैऋत्य अरबी समुद्रावर 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. 2 ते 3 जून रोजी लक्षद्वीप प्रदेश, किनारी केरळ, कोमोरिन प्रदेश आणि मन्नारच्या आखातात पावसाची शक्यता आहे. यासोबतच हवामान खात्याने पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार पावसाचा इशारा देखील यावेळी दिला आहे.

हवामान खात्याने (Indian Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, येत्या पाच दिवसांत बिहार, झारखंड, ओडिशामध्ये वादळ आणि गडगडाट होण्याची शक्यता आहे. मिझोराम, त्रिपुरा, आसाम आणि मेघालयमध्ये 4 जूनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे.  अरुणाचल प्रदेशात 1 ते 4 जून या आठवड्यात मुसळधार पाऊस पडू शकतो.

दरम्यान, महाराष्ट्रातील काही भागात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी बघायला मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते, राजधानी मुंबई समवेतच दक्षिण मध्ये कोकणात, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मान्सूनपूर्व जोरदार पावसाची शक्यता आहे. निश्चितच राज्यातील देखील उकाड्याने हैराण झालेल्या जनतेस यामुळे आराम मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe