Mansoon Update: ये रे ये रे पावसा…! मान्सूनचं राज्यात दणक्यात आगमन! आज ‘या’ ठिकाणी पावसाची दमदार बॅटिंग होणार, वाचा सविस्तर

Ajay Patil
Published:

Maharashtra Mansoon Update: भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) दिलेल्या अद्यावत माहिती नुसार, काल म्हणजेच 10 जूनला राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे.

काल मान्सून हा गोव्याची सरहद्द पार करत दक्षिण कोकणातील वेंगुर्ल्यात दाखल झाला. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनची (Mansoon 2022) आतुरतेने वाट पाहणाऱ्या बळीराजाला (Farmer) तसेच उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

आता आगामी काही दिवसात मान्सून (Mansoon Rain) हा संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) व्यापणार आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मते मान्सूनचा राज्यातील प्रवास हा योग्य गतीने सुरू आहे.

मान्सूनचे राज्यात आगमन झाले आहे आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात भारतीय हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट देखील जारी केला आहे.

येत्या दोन दिवसात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, यावर्षी केरळमध्ये मान्सूनचे वेळेआधीच आगमन झाले होते.

खरं पाहता दरवर्षी मान्सून 1 जूनला केरळमध्ये दाखल होत असतो मात्र यावर्षी मान्सून हा 29 मे ला केरळमध्ये दाखल झाला. त्यामुळे राज्यात देखील मान्सून लवकर येणार असल्याचे भाकित भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आले होते.

मात्र मान्सूनच्या प्रवासात अडथळा निर्माण झाल्याने मान्सून हा यावर्षी तीन दिवस उशिरा तळकोकणात म्हणजेच महाराष्ट्रात दाखल झाला. काल मान्सून महाराष्ट्रातील वेंगुर्ला दाखल झाल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले.

दरम्यान राज्यातील पुढील मान्सून प्रवासाला पोषक वातावरण असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून सांगितले गेले असून आगामी काही दिवसात मान्सून हा संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे.

मित्रांनो भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसात कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग खान्देश मधील नंदूरबार, धुळे, जळगाव, पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली.

मराठवाड्यातील जालना, बीड, परभणी, औरंगाबाद, नांदेड, तसेच विदर्भातील बुलढाणा, वाशीम, अमरावती, यवतमाळ, अकोला, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाने या जिल्ह्याना पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. शिवाय पावसाचा अंदाज घेऊन घराबाहेर पडा, अशा सूचना देखील जनतेसाठी जारी करण्यात आल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe