Monsoon Update: पंजाबरावांचा अंदाज आला ना…..! 14 तारखेला ‘या’ भागात कोसळेल मान्सूनचा पाऊस, वाचा सविस्तर

Published on -

Panjabrao Dakh Havaman Andaz: मान्सूनच्या पावसाने 10 तारखेला महाराष्ट्रात दस्तक दिल्यानंतर तो आता संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यासाठी वळला आहे.

यामुळे राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) तसेच शेती क्षेत्राशी संबंधित सर्व घटकात मोठे उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे.

शेतकरी बांधव बी-बियाण्याच्या खरेदीसाठी तसेच पेरणीपूर्व नियोजनासाठी लगबग करत असल्याचे चित्र आता बघायला मिळत आहे. याशिवाय शेतकरी बांधव आता पेरणीयोग्य पाऊस पडण्याची वाट देखील बघत आहे.

अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांचे मान्सूनचा हवामान अंदाजाकडे बारीक लक्ष लागून आहे. दरम्यान, आपल्या अचूक अंदाजासाठी शेतकऱ्यांच्या मध्यात आपला एक वेगळा नावलौकिक कमावलेल्या पंजाबराव डख यांचा सुधारित अंदाज आता जाहीर झाला आहे.

पंजाबराव डख (Panjabrao Dakh) साहेबांनी 13 आणि 14 जून चा आपला मान्सूनचा अंदाज सार्वजनिक केला आहे.मान्सूनच्या (monsoon) पावसाने आता राज्यातील अनेक ठिकाणी हजेरी लावली आहे.

काही ठिकाणी पावसाने (rain) दमदार एंट्री केली असून अनेक भागात पेरणीला शेतकऱ्यांनी सुरवात देखील केली आहे. दरम्यान, कृषी विभागाने तसेच पंजाबराव डख साहेबांनी (Panjabrao Dakh News) शेतकऱ्यांना 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतर पेरणी करण्याचा सल्ला दिला आहे.

यामुळे शेतकरी बांधवांनी देखील पेरणीयोग्य पाऊस (Monsoon news) झाल्याशिवाय पेरणी करू नये अन्यथा दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू शकतो शिवाय पूर्व मशागतीपासून ते पेरणीकरेपर्यंत शेतकऱ्यांनी केलेली सर्व मेहनत देखील वाया जाऊ शकते.

पंजाबरावांचा 13 आणि 14 जुनचा अंदाज वाचामित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, पंजाबराव डख साहेबांनी वर्तवलेल्या नवीनतम सुधारित अंदाजानुसार (Panjab Dakh Weather Report), 14 जून पर्यंत मान्सूनचा पाऊस हा पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर शिवाय संपूर्ण मध्य महाराष्ट्र व्यापणार आहे.

एवढेच नाही तर 14 जून अर्थात उद्या मान्सूनचा पाऊस हा चिखली जालना औरंगाबाद समवेतच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात हजेरी लावणार आहे. यादरम्यान मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता देखील पंजाबराव डख साहेबांनी वर्तवली आहे.

याशिवाय आज आणि उद्या पूर्व विदर्भात देखील पावसाचा अंदाज असल्याचे पंजाबराव डख यांनी नमूद केले आहे. निश्चितच येत्या दोन दिवसात मान्सूनचा पाऊस हा राज्यातील अनेक ठिकाणी हजेरी लावणार असून यामुळे शेतकरी बांधवांना निश्‍चीतच दिलासा मिळणार आहे.

शिवाय आता पेरणीपूर्व तयारी करणाऱ्या बळीराजाला देखील आपल्या कामाची गती वाढवावी लागणार आहे. दरम्यान पंजाबराव डख यांनी मी शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही असं देखील यावेळी नमूद केलं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe