Milk Rate : आनंदाची बातमी! ‘या’ दूध संघाकडून शेतकऱ्यांना मोठी भेट ; दूध खरेदी दरात केली ‘इतकी’ वाढ, वाचा सविस्तर

Ajay Patil
Published:
milk rate

Milk Rate : महाराष्ट्र समवेतच संपूर्ण भारतवर्षात येत्या काही दिवसात दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून नियमित पिक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना 50 हजार रुपये अनुदान देण्यास सुरुवात झाली आहे.

यामुळे नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याव्यतिरिक्त आता गोकुळ दूध संघाने (Gokul Milk Association) देखील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. गोकुळ दूध (Gokul Milk) संघाने दूध खरेदी दरात वाढ (Gokul Milk Rates) करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना (Milk Producers) दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही एक मोठी आनंदाची भेट असल्याचे सांगितले जात आहे. गोकुळ दूध संघाने गाई आणि म्हशीच्या दूध (Milk Rate) खरेदी दरात वाढ केली आहे. यामुळे साहजिकच दूध उत्पादक शेतकरी बांधवांना (Farmer) याचा मोठा आर्थिक फायदा होणार आहे.

दिवाळी सणाला 24 ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे. त्याआधीच गोकुळ दूध संघाने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिवाळी गिफ्ट म्हणून पाहिलं जात आहे. विशेष म्हणजे गाई-म्हशीच्या खरेदीदरात केलेली वाढ शुक्रवार पासून लागू होणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण गोकुळ दूध संघाने गाई म्हशीच्या दुधाच्या खरेदी दरात किती वाढ केली याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

गाई-म्हशीच्या दुध खरेदीदरात किती रुपयाची झाली वाढ

मित्रांनो दसऱ्याच्या आपणास ठाऊकच आहे शेती नंतर भारतात सर्वाधिक पशुपालन केले जाते. पशुपालन हे मुख्यतः दुग्ध उत्पादनासाठी पशुपालक शेतकरी बांधव करत असतात. आपल्या राज्यात देखील पशुपालन करणारे शेतकरी बांधवांची संख्या विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधव दूध विक्रीचा व्यवसाय करत असतात.

अशा परिस्थितीत गोकुळ दूध संघाने घेतलेला हा निर्णय हजारो शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. गोकुळ दूध संघाने आता गाई म्हशीच्या दूध खरेदी दरात वाढ केली आहे. गोकुळ दूध संघाने म्हशीच्या दूध खरेदी दरात प्रति लिटर तब्बल दोन रुपयांची वाढ केली आहे. याव्यतिरिक्त गोकुळ दूध संघाने गाईच्या खरेदी दरात प्रति लिटर तीन रुपयांची वाढ केली आहे. दरवाढीनंतर आता गोकुळ दूध संघ म्हशीच्या दुधाला 47.50 रुपये प्रति लिटरचा भाव देणार आहे.

तसेच गाईच्या दुधाला आता 35 रुपये प्रति लिटर असा दर गोकुळ दूध संघ देणार आहे. दूध उत्पादक शेतकरी बांधवांनी गोकुळ दूध संघाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, गोकुळ दूध संघाने गेल्या दीड वर्षात तब्बल नऊ रुपयांची खरेदी दरात वाढ केली आहे.

आतापर्यंत गोकुळ दूध संघाने खरेदी विक्री दरात तब्बल सहा वेळा वाढ केली आहे. निश्चितच दूध संघाचा हा निर्णय दूध उत्पादक शेतकरी बांधवांच्या फायद्याचा आहे. यामुळे राज्यातील हजारो दूध उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe