Mini Tractor Anudan: या बचत गटांना मिळेल अनुदानावर मिनी ट्रॅक्टर, सरकारकडून मिळेल तब्बल ‘इतके’ अनुदान, या जिल्ह्यासाठी अर्ज सुरू

Ahmednagarlive24
Published:
m

Mini Tractor Anudan:-कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आणि समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांकरिता शासनाच्या(Government) अनेक प्रकारच्या योजना आहेत. यामध्ये जर आपण शेतीचा विचार केला तर शेतीच्या विकासासाठी आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी याकरिता शासनाच्या माध्यमातून अनेक योजना(Scheme) राबवल्या जात आहेत.

यामध्ये शेती मध्ये यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन मिळावे म्हणून अनेक प्रकारच्या यंत्रांवर देखील अनुदान दिले जात आहे. यामध्ये जर आपण मिनी ट्रॅक्टरचा विचार केला तर शेतीच्या अनेक कामांसाठी हे ट्रॅक्टर(Tractor) उपयुक्त असून या ट्रॅक्टरच्या खरेदीवर देखील आता शासनाकडून 90 टक्के अनुदान दिले जात आहे.

 मिनी ट्रॅक्टर साठी मिळेल 90% अनुदान(Subsidy)

समाजातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचे जे काही स्व:सहायता बचत गट आहेत त्या बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने देण्याकरिता काही बाबींची पूर्तता करणाऱ्या गटांकडून 31 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. अशा पद्धतीची माहिती सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण पुणे यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून कळविले आहे.

 हे अनुदान मिळवण्यासाठी काही पात्रता निकष

1- यामध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचे जे काही स्वयंसहायता बचत गट आहेत त्यांचे सदस्य हे महाराष्ट्राचे रहिवासी असणे गरजेचे आहे.

2- तसेच गटातील कमीत कमी 80% सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असणे गरजेचे आहे. महत्वाचे म्हणजे बचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत.

3- मिनी ट्रॅक्टर व त्याची साधने यांच्या खरेदीची जास्तीत जास्त मर्यादा ही तीन लाख 50 हजार इतकी आहे.

4- यामध्ये ही जी काही कमाल मर्यादा आहे त्या मर्यादेच्या रकमेचा किंवा प्रत्यक्ष किमतीच्या दहा टक्के स्वतःचा हिस्सा बचत गटांना भरायचा असून त्यानंतर 90 टक्के म्हणजेच तीन लाख पंधरा हजार रुपये शासकीय अनुदान देण्यात येईल.

5- या योजनेअंतर्गत लाभार्थी स्वयंसहायता बचत गटांना जर 9 ते 18 अश्वशक्ती पेक्षा जास्त क्षमतेचे ट्रॅक्टर व त्याची उपसाधने घ्यायचे असतील तर शासनाच्या माध्यमातून तीन लाख पंधरा हजार रुपये अनुदान देण्यात येईल व त्यापेक्षा जास्तीचे रक्कम बचत गटांना स्वतः खर्च करावे लागेल.

6- स्वयंसहायता बचत गटाचे राष्ट्रीयकृत  बँकेमध्ये बचत गटाच्या नावे बँक खाते उघडणे गरजेचे असून हे बँकेचे खाते गटाचे अध्यक्ष व सचिव यांच्या आधार क्रमांकाशी लिंक करणे गरजेचे आहे.

7- बचत गटाने मिनी ट्रॅक्टर खरेदी केल्याची पावती सादर केल्यानंतर याची खातरजमा केली जाईल व संबंधित बचत गटाला शासकीय अनुदानाचा 50% हप्ता गटाच्या आधार संलग्न असलेल्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल.

8- उरलेला 50 टक्के अनुदानाचा हप्ता हा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांची आरटीओ कार्यालयाकडे नोंदणी केल्यानंतर बचत गटाच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल

 अर्ज कुठे करावेत शेवटची तारीख

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर असे लाभार्थी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सामाजिक न्याय भवन, सर्वे नंबर 104/105, विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या समोर, येरवडा, पुणे 411006 या ठिकाणी करू शकतात. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट 2023 आहे.

 अर्जासोबत आवश्यक कागदपत्र

अर्ज करताना बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये आधार क्रमांकाची लिंक असलेले खाते पासबुकची प्रथम पानाची झेरॉक्स प्रत, तसेच बचत गटातील प्रत्येक सदस्याचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये आधार क्रमांकाची लिंक असलेले खाते पासबुकची प्रथम पानाची झेरॉक्स प्रत, बचत गटाचे घटना पत्र, बचत गटाची कार्यकारणी सदस्यांची मुळयादी, सदस्यांचा स्वतःचा जातीचा दाखला, कोऱ्या कागदावर फोटोसह बचत गटाची ओळख इत्यादी कागदपत्र आवश्यक आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe