Monsoon Update: पंजाबरावांचा 30 जुलै पर्यंतचा सुधारित हवामान अंदाज…! ‘या’ जिल्ह्यात हवामान कोरडं राहणार, ‘या’ जिल्ह्यात मुसळधार कोसळणार

Monsoon Update: राज्यात पावसाबाबत मोठे विरोधाभासाचे चित्र आहे. राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस (Rain) झाला आहे तर काही ठिकाणी शेतकरी बांधव अजूनही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

ज्या ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस झाला आहे तेथील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे, दरम्यान ज्या भागात पावसाची (Monsoon) कमी हजेरी लागली आहे त्या भागातील पिकांची देखील वाढ खुंटली असल्याचे शेतकरी नमूद करत आहेत.

यामुळे दोन्ही बाजूंनी शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान होत आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये पावसाचा (Monsoon News) अलर्ट जारी केला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेलं नाव अर्थातच हवामान तज्ञ परभणी भूमिपुत्र पंजाबरावं डख यांचा देखील 30 जुलैपर्यंतचा नवीनतम सुधारित हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) आता जाहीर करण्यात आला आहे.

मित्रांनो जस की आपणास ठाऊकच आहे पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजाकडे (Panjab Dakh Weather Report) शेतकरी बांधवांचे मोठे बारीक लक्ष लागून असते. अशा परिस्थितीत आम्ही देखील पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) यांचा हवामान अंदाज आमच्या वाचक मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो.

चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांचा नवीन सुधारित अंदाज. काय म्हणलं पंजाबराव:- हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्या मते, 26 आणि 27 जुलै रोजी राज्यातील यवतमाळ, नांदेड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, बीड या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

मात्र 28 तारखे नंतर राज्यात अनेक ठिकाणी हवामान कोरडे राहणार आहे. पंजाब राव यांनी दिलेल्या माहितीनुसार 28, 29 आणि 30 जुलै रोजी राज्यात सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यात सर्वदूर पाऊस न पडता तुरळक ठिकाणी मोठा पाऊस कोसळणार आहे. उर्वरित जिल्ह्यात मात्र 28 ते 30 जुलैपर्यंत हवामान कोरडे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe