Monsoon Update: पंजाबरावांचा मान्सून अंदाज आला रे…! ‘या’ भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, वाचा संपूर्ण अंदाज

Ajay Patil
Published:

Monsoon Update: सध्या राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस (Rain) पडत आहे. काही ठिकाणी मोसमी पावसामुळे (Monsoon) शेतकर्‍यांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे. मात्र, राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची मोठी नासाडी झाली आहे शिवाय सामान्य जनतेला देखील नाना प्रकारची संकटांना तोंड द्यावे लागत आहेत. दरम्यान असे असले तरी राज्यातील अजूनही काही भागात अपेक्षित असा मोसमी (Monsoon News) पाऊस बघायला मिळालेला नाही. त्यामुळे तेथील शेतकरी बांधवांची डोकेदुखी वाढली आहे. एकंदरीत मोसमी पावसामुळे कही खुशी तो कही गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

ज्या भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे अशा भागात शेतकरी बांधवांनी पेरणीची कामे उरकली आहेत. मात्र ज्या भागात अजूनही अपेक्षित असा पाऊस झालेला नाही अशा काही मोजक्या ठिकाणी अजूनही पेरणी झालेली नाही. शिवाय काही भागात शेतकरी बांधवांनी पेरणी केली आहे मात्र पेरणीनंतर पावसाने उघडीप दिल्यामुळे त्यांची डोकेदुखी वाढली आहे.

यामुळे सध्या राज्यात काही ठिकाणी शेतकरी बांधव पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत तर काही ठिकाणी पाऊस उघडण्याची बघितली जात आहे. दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळवलेले पंजाब राव डख यांचा मान्सून अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaz) समोर आला आहे.

पंजाबरावांनी (Panjabrao Dakh) 17 जुलैपर्यंत आपला मान्सून अंदाज वर्तवला आहे. पंजाबराव (Panjabrao Dakh News) यांच्या मते, आज पासून नऊ तारखेपर्यंत राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यानंतर 12 जुलैपर्यंत काही काळ पावसाची उघडीप राहणार आहे.

म्हणून शेतकरी बांधवांनी या दरम्यान त्यांची शेतीची कामे उरकून घ्यावीत असे देखील पंजाबराव (Panjab Dakh Weather Report) यांनी यावेळी नमूद केले. बारा तारखेनंतर मात्र 13 ते 17 जुलै दरम्यान राज्यात मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळणार असून राज्यातील अनेक भागात या कालावधीत अतिवृष्टी सदृश्य पाऊस होणार असल्याचे भाकीत पंजाबराव यांनी वर्तवले आहे.

तसेच राजधानी मुंबईत देखील या कालावधीत अतिवृष्टी सदृश्य पाऊस कोसळणार असून मुंबईकरांना यावेळी पंजाबराव यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. या कालावधीत पूर्व विदर्भ मध्ये सुद्धा अतिवृष्टी होणार असल्याचा पंजाब राव यांनी अंदाज वर्तवला आहे. यामुळे नागरिकांना तसेच शेतकरी बांधवांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe