Monsoon Update: राज्यात पुन्हा मोसमी पावसासाठी (Monsoon News) पोषक वातावरण तयार झाल्याने गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस (Rain) बघायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते पावसाचा जोर अजूनच वाढण्याची शक्यता आहे.
आज 7 ऑगस्ट रोजी दक्षिण कोकणात तसेच दक्षिण कोकणाला लागून घाटमाथा परिसरात तसेच पूर्व विदर्भात जोरदार स्वरूपाचा पाऊस बरसणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मोठ्या पावसाची (Monsoon) शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार आज कोकणमधील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर आणि विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असून या जिल्ह्यांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, परभणी, नांदेड, हिंगोली, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता असून या जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बुलडाणा, वाशीम या दोन जिल्ह्यांना विजांसह पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या नावाचा डंका वाचवणाऱ्या पंजाबराव डख यांचा देखील हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) सार्वजनिक झाला आहे. पंजाबरावांनी (Panjabrao Dakh) वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. 7 ते 9 ऑगस्ट दरम्यान राज्यात जवळपास सर्वत्र पाऊस बघायला मिळणार आहे.
मात्र आज आणि उद्या उत्तर महाराष्ट्रात म्हणजेच धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यात अतिवृष्टी सारखा पाऊस बघायला मिळणार आहे. तसेच राजधानी मुंबईसमवेत पुणे नाशिक आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात नऊ तारखेपर्यंत पावसाची शक्यता पंजाबराव (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवली आहे. याशिवाय पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा या विभागात देखील नऊ तारखेपर्यंत जोरदार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे.
पंजाबराव डख यांनी एका कार्यक्रमावेळी बोलताना सांगितले की, भविष्यात शेतकरी बांधवांचे नुकसान होऊ नये यासाठी ते एका वर्षाचा पावसाचा अंदाज सांगणार आहेत. म्हणजे आता शेतकरी बांधवांना एक वर्ष आधी पावसाचा अंदाज बांधता येणार असल्याचे पंजाबराव यांनी स्पष्ट केले आहे. निश्चितच यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नसल्याचे पंजाब राव यांनी सांगितले.