Panjabrao Dakh : आता फक्त 5 दिवस पावसाचे! ‘या’ तारखेनंतर राज्यात थंडीला होणार सुरुवात, पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज

Ajay Patil
Published:
panjabrao dakh

Panjabrao Dakh : राज्यात परतीचा पाऊस (Rain) चांगला त्राहिमाम् माजवत आहे. राज्यातील अनेक भागात परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील (Kharif Season) पिकांची नासाडी होत आहे.

राज्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस (Maharashtra Rain) देखील झाला आहे. यामुळे खरीप हंगामातील काढण्यासाठी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात सध्या सोयाबीन या पिकाची काढणी सुरू आहे. अशा परिस्थितीत परतीचा पाऊस या पिकांसाठी घातक ठरत आहे.

राजधानी मुंबई ठाणे परिसरात परतीच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. दरम्यान राज्यातील इतरही जिल्ह्यात परतीचा पाऊस चांगलाच बरसत आहे. नाशिक जिल्ह्यातील बहुतांशी भागात काल पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील काढण्यासाठी आलेल्या मका पिकासमवेतच इतर खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे.

दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळी ओळख निर्माण करणारे पंजाबराव डख यांचादेखील हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) समोर आला आहे. पंजाबराव (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार आता राज्यात फक्त पाच दिवस पावसाचे (Monsoon) राहणार आहेत.

राज्यात 12 आणि 13 ऑक्टोबर रोजी परतीचा पाऊस जोरात बरसणार आहे. 13 ऑक्टोबर नंतर राज्यात मात्र पावसाचा (Monsoon News) जोर कमी होणार आहे. राज्यात 14 आणि 15 ऑक्‍टोबर रोजी पाऊस पडणार आहे मात्र पावसाचा जोर खूपच कमी राहील. शिवाय राज्यात 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे पंजाबराव यांनी नमूद केले आहे.

मात्र राज्यात 17 ऑक्टोबर नंतर पावसाची उघडीप राहणार आहे. राज्यात 18 आणि 19 ऑक्टोबर रोजी दाट स्वरूपाचे धुके पाहायला मिळणार आहे. तसेच 19 ऑक्टोबर पासून राज्यात थंडीला सुरुवात होणार आहे. निश्चितच थंडीला सुरुवात झाल्यानंतर फळबाग पिकांना मोठा फायदा होणार आहे.

शिवाय नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांद्याला देखील याचा मोठा फायदा होणार असल्याचे शेतकरी नमूद करत आहेत. एकंदरीत राज्यात आता फक्त पाच दिवस पावसाचे राहिले आहेत.

त्यामुळे पाच दिवसानंतर राज्यात शेती कामाला मोठा वेग येणार आहे शिवाय रब्बी हंगामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. दरम्यान सध्या कोसळत असलेल्या परतीचा पाऊस रब्बी हंगामासाठी पोषक असल्याचे जाणकारांनी नमूद केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe