Panjabrao Dakh : ब्रेकिंग! दिवाळीपर्यंत राज्यात धो-धो पाऊस कोसळणार, पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज, वाचा सविस्तर

Published on -

Panjabrao Dakh : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची (Rain) संततधार सुरू आहे. काल देखील राजधानी मुंबई आणि ठाणे परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस (Monsoon News) बघायला मिळाला. रात्री राजधानी मुंबई आणि ठाणे मध्ये जोरदार पाऊस (Monsoon) झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

सकाळी देखील राजधानी मुंबई मध्ये पावसाची (Maharashtra Rain) रिपरिप सुरूच होती. राजधानी मुंबई व्यतिरिक्त राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. यामुळे राज्यातील काही ठिकाणी खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे तर काही ठिकाणी खरीप हंगामातील पिकांची अतिवृष्टी सारख्या पावसामुळे नासाडी होतं आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की भारतीय हवामान विभागाने आज देखील राज्यात पाऊस पडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आज विदर्भात तसेच मराठवाड्यात पावसाची शक्यता लक्षात घेता हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे.

रम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेलं नाव अर्थातच पंजाबराव डख यांचादेखील हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) समोर आला आहे. पंजाबरावांनी (Panjabrao Dakh News) वर्तवलेल्या आपल्या नवीनतम हवामान अंदाजानुसार, 20 सप्टेंबर पर्यंत राज्यात पावसाचा जोर कमी राहणार आहे. म्हणजेच राज्यात 20 सप्टेंबर पर्यंत पाऊस पडेल मात्र पावसाचे प्रमाण हे कमी राहणार आहे.

नंतर मात्र 21 ते 24 सप्टेंबर पर्यंत राज्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे. तसेच सात ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातून परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे. शिवाय पंजाब राव यांनी दिवाळीमध्ये दोन मोठे पाऊस कोसळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दिवाळीत विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता असल्याचे पंजाबराव डख यांनी स्पष्ट केले असून नाशिक मध्ये देखील या कालावधीत पाऊस पडू शकतो असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

तसेच पंजाब रावांनी वर्तवलेल्या आपल्या नवीन आणि अतिशय महत्त्वाच्या अंदाजात थंडीच्या बाबतीत देखील मोठे विधान केले आहे. पंजाबरावांच्या मते, राज्यात 28 ऑक्टोबर पासून थंडीला सुरुवात होणार आहे.

निश्चितच पंजाब रावांचा हा नवीन अंदाज शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरणार आहे. सरतेशेवटी पंजाब रावांनी शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही अशी ग्वाही देत हवामानात अचानक बदल झाल्यास शेतकर्‍यांना त्वरित कळवले जाईल असे नमूद केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe