Panjabrao Dakh : पंजाबरावांचा अंदाज खरा ठरतोच ! आज कस राहणार हवामान ; वाचा हवामान अंदाज

Ajay Patil
Published:
Panjabrao Dakh Breaking News

Panjabrao Dakh : राज्यात कालपासून पावसाचा जोर कमालीचा ओसरला आहे. मान्सून आता महाराष्ट्रातून माघारी फिरला आहे. भारतीय हवामान विभागाने देखील मान्सून माघारी फिरल्याची पुष्टी केली आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते, आज राज्यात हवामान कोरडे राहणार आहे.

यामुळे निश्चितच राज्यातील शेतकरी बांधवांना (Farmer) मोठा दिलासा नाही. मित्रांनो खरं पाहता गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ माजवला होता. परतीच्या पावसामुळे राज्यातील खरीप हंगाम धोक्‍यात आला होता.

खरीप हंगामातील पिके अंतिम टप्प्यात असताना कोसळलेला परतीचा पाऊस पिकांसाठी घातक ठरला असून यामुळे शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात घट घडून आली आहे. खरं पाहता जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांना मोठा फटका बसला होता यापासून शेतकरी बांधवांनी कसेबसे आपले पीक वाचवले आणि काढणीयोग्य परिस्थितीत आणले होते मात्र परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान आता कालपासून राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. भारतीय हवामान विभागाने आता राज्यातील हवामान कोरडे राहणार असून थंडीचा जोर वाढणार असल्याचे नमूद केले आहे. दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात चिरपरिचित व्यक्तिमत्व अर्थातच पंजाबराव डख यांनी वर्तवलेला हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) देखील तंतोतंत खरा ठरला आहे.

पंजाबराव डख यांनी 23 तारखे पासून राज्यात पावसाची उघडीप होणार असून थंडीचा जोर वाढणार असल्याची भविष्यवाणी केली होती. आता पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) यांचा हा अंदाज खरा ठरत असून काल पासून राज्यात पावसाची उघडीप असून थंडीचा जोर देखील वाढला आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा शेतीकामाला जोर येणार आहे. रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीला पण वेग येणार आहे.

दरम्यान जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार परतीचा पाऊस (Monsoon) चांगला बरसला असल्याने शिवाय पावसाळी काळात यावर्षी चांगला पाऊस (Rain) झाला असल्याने रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी पाण्याची कमतरता भासणार नसून रब्बी हंगामातील पिकांना यामुळे पोषक वातावरण तयार होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe