Panjabrao Dakh : 2023 मध्ये ‘या’ तारखेला होणार मान्सूनचे आगमन ; पंजाबराव डख यांचा पुढील मान्सूनबाबतचा सविस्तर अंदाज

Ajay Patil
Published:
Panjabrao Dakh Havaman Andaj 2023

Panjabrao Dakh : आपल्या हवामान अंदाजासाठी चीरपरिचित व्यक्तिमत्व अर्थातच हवामान तज्ञ पंजाबराव डख त्यांनी पुढील 2023 मधील मान्सून बाबत आपला अंदाज सार्वजनिक केला आहे. खरं पाहता पंजाबरावांचा हवामान अंदाज शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.

शेतकरी बांधवांच्या मते, या हवामान अंदाजाचा त्यांना फायदा होत असून अंदाज तंतोतंत खरा ठरतो. त्यामुळे त्यांना शेतीची कामे करताना सोयीचे होते. दरम्यान आता अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी वांबोरी येथे एका कार्यक्रमादरम्यान पंजाबराव डख यांनी पुढील मान्सून बाबत महत्त्वाची माहिती दिली असून सध्याचा देखील हवामान अंदाज सार्वजनिक केला आहे.

पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे, आज म्हणजे 5 मे रोजी राज्यात ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. मात्र 12, 13 आणि 14 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. अहमदनगर जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता असल्याचे पंजाबरावांनी नमूद केले आहे.

दरम्यान पुढील वर्षी म्हणजेच येत्या मानसून मध्ये आठ जूनला पावसाची सुरुवात होणार आहे. चांगला पाऊस मात्र 22 ते 28 जून दरम्यान चांगला पाऊस कोसळेल आणि जुलै महिन्यात दहा जुलै पासून ते 19 जुलै पर्यंत जोरदार पाऊस राहील. 16 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2023 80 टक्के भागात पाऊस होईल.

तर 26 ऑक्टोबर 2023 पासून प्रत्यक्षात थंडीला सुरुवात होणार आहे. निश्चितच हा अंदाज पुढील मान्सून बाबत असल्याने यामध्ये बदल होऊ शकतात. या कार्यक्रमादरम्यान पंजाबराव डख यांनी शेतकरी बांधवांना पावसावर आधारित शेती करण्याचे आवाहन केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe