Panjabrao Dakh : पंजाबरावांचा हवामान अंदाज! उद्या राज्यातील या 17 जिल्ह्यात पाऊस पडणार, वाचा काय म्हणताय डख

Ajay Patil
Published:
Panjabrao Dakh Havaman Andaj 2023

Panjabrao Dakh : राज्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने (Rain) उघडीप दिली आहे. यामुळे राज्यात शेतीकामाला मोठा वेग आला आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच सप्टेंबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे (Monsoon) राज्यातील सर्व धरणे शंभर टक्के क्षमतेने भरले आहेत.

यामुळे शेतकरी बांधवांना उन्हाळी हंगामात याचा फायदा होणार आहे. मात्र असे असले तरी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या नावाचा डंका वाजवणाऱ्या पंजाबराव डख यांचादेखील हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) आता समोर आला आहे.

पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवलेल्या आपल्या नवीनतम सुधारित हवामान अंदाजानुसार, उद्यापासून राज्यात पावसासाठी (Monsoon News) पोषक वातावरण तयार होत आहे.

उद्या अर्थातच 27 सप्टेंबर पासून ते 4 ऑक्टोबर पर्यंत राज्यात पाऊस कायम राहणार आहे. या कालावधीत कोसळणारा पाऊस हा रिमझिम स्वरूपाचा राहणार आहे. निश्चितचं संपूर्ण नवरात्र उत्सव हा रिमझिम स्वरूपाच्या पावसात जाणार आहे. पंजाबराव यांच्या मते, 4 ऑक्टोबर पर्यंत राज्यातील पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस कोसळणार आहे.

यामध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, अकोला, वाशिम, छत्रपती संभाजी महाराज नगर, जालना, लातूर, उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, अहमदनगर या जिल्ह्यात रिमझिम स्वरूपाचा पाऊस बरसणार असल्याचे पंजाब राव यांनी स्पष्ट केले आहे.

एकंदरीत उद्यापासून पुन्हा एकदा राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे. मित्रांनो या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः विदर्भातील तसेच मराठवाड्यातील शेतकर्‍यांचे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि त्यानंतर उद्भवलेली पूरसदृश्य परिस्थिती मुळे मोठे नुकसान नमूद करण्यात आला आहे.

दरम्यान महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांना मदत जाहीर केली आहे. आगामी काही दिवसात शेतकऱ्यांना जाहीर झालेली मदत प्रत्यक्षात मिळणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार शासनाकडून जिल्हा प्रशासनाला मदतीचा निधी देण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाकडे निधी प्राप्त झाल्यानंतर लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यात मदतीचा निधी हा वर्ग केला जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe