Panjabrao Dakh : ऑगस्ट महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यात राज्यात सर्वत्र पावसाची (Rain) उघडीप होती. यामुळे खरीप हंगामातील पिके अक्षरशा होरपळत असल्याचे दृश्य राज्यात बघायला मिळाले. विशेषता मराठवाड्यात पिकांना कमी पावसाचा (Monsoon) मोठा फटका बसला.
खरं पाहता मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात यावर्षी आधी पासूनच पावसाचे (Monsoon News) कमी प्रमाण बघायला मिळाले. त्यात ऑगस्ट महिन्यातील दुसरा पंधरवडा मराठवाड्यात पाऊस झाला नसल्याने पिके अक्षरशः जळून खाक होत असल्याचे चित्र आहे.
आता 31 ऑगस्ट म्हणजेच गणरायाच्या आगमनाच्या दिवसापासून राज्यातील अनेक भागात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाडा व्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्र तसेच खानदेश कोकण किनारपट्टी विदर्भ सर्वत्र 31 ऑगस्टला पावसाची हजेरी बघायला मिळाली.
दरम्यान राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असून ठिकाणी अतिवृष्टी देखील होणार असल्याचे परभणीचे प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) यांनी नमूद केले आहे. मित्रांनो नुकत्याच दोन-तीन दिवसांपूर्वी पंजाबराव डख यांनी सप्टेंबर महिन्यातील आपला सुधारित हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) जारी केला आहे.
पंजाबराव डख यांनी 18 सप्टेंबर पर्यंत आपला हवामान अंदाज सांगितला असून राज्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याचे वर्तवले आहे. यामुळे निश्चितच निश्चितचं खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज.
काय म्हणताय पंजाबरावं डख (Panjabrao Dakh)
पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यात 4 सप्टेंबर म्हणजेच आजपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. 4 सप्टेंबर पासून ते 18 सप्टेंबरपर्यंत राज्यात पावसासाठी पोषक वातावरण राहणार असून राज्यात जवळपास सर्वत्र या कालावधीत पाऊस पडणार आहे.
पंजाबरावांच्या मते, राज्यात 8, 9 आणि 10 सप्टेंबर रोजी राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी होणार आहे. एवढेच नाही तर 18 सप्टेंबर पर्यंत कोसळणारा पाऊस हा विजांच्या कडकडाटासह कोसळणार आहे. या कालावधीत राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागात सर्वाधिक पाऊस बघायला मिळणार आहे.
यामुळे शेतकरी बांधवांनी आपली तसेच आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी असे देखील आवाहन यावेळी हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी केले आहे. पंजाबराव यांच्या मते, 18 सप्टेंबर पर्यंत राज्यात कोसळणारा पाऊस ओढे-नाले भरून वाहणारा असणार आहे.
मात्र 18 सप्टेंबर पर्यंत राज्यात पाऊस हा भाग बदलत पडणार आहे. अशा परिस्थितीत ज्या भागात पिके उन्हामुळे किंवा पावसाच्या अभावामुळे होरपळत आहेत अशा ठिकाणी पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे. मात्र काही ठिकाणी अतिवृष्टी होणार असल्याने जास्तीच्या पावसाचा देखील शेतकरी बांधवांना फटका बसू शकतो.