Panjabrao Dakh : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाची (Maharashtra Rain) उघडीप बघायला मिळत आहे. दरम्यान मान्सून (Monsoon) आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. आगामी काही दिवसात मान्सून (Monsoon News) संपूर्ण भारत वर्षातून अलविदा घेणार आहे.
अशा परिस्थितीत हवामान विभागाने सप्टेंबर मध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस (Rain) बरसणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. महाराष्ट्रात देखील आगामी काही दिवसात मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे. दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी शेतकऱ्यांमध्ये मोठ विश्वासाचं नाव अर्थातच परभणीचे भूमिपुत्र पंजाबराव डख यांचादेखील हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) आता समोर आला आहे.
मित्रांनो पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार पाच तारखेपासून ते अठरा तारखेपर्यंत राज्यात पावसासाठी पोषक वातावरण आहे. 18 सप्टेंबर पर्यंत राज्यात भाग बदलत पाऊस पडणार असल्याचे पंजाबराव यांनी नमूद केले आहे.
या कालावधीत कोसळणारा पाऊस हा विजांच्या कडकडाटासह कोसळणार असून अनेक ठिकाणी वीज पडण्याची घटना घडू शकते यामुळे शेतकरी बांधवांना सतर्क राहण्याचे देखील आवाहन पंजाब राव यांनी केले आहे. या शिवाय पंजाब रावांनी आठ, नऊ आणि दहा तारखेला राज्यातील तमाम शेतकरी बांधवांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
पंजाबराव यांच्या मते, 8, 9 आणि 10 तारखेला राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस कोसळणार आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी या कालावधीत आपली तसेच आपल्या पशुधनाची काळजी घेणे महत्वाच राहणार आहे. पंजाबराव यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, 18 सप्टेंबर पर्यंत राज्यात जवळपास सर्वत्र पाऊस बघायला मिळणार आहे मात्र हा पाऊस पूर्व विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मध्ये अधिक राहणार आहे.
निश्चितचं गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असल्याने राज्यातील खरीप हंगामातील पिके होरपळत असल्याचे चित्र आहे. विशेषता पावसाच्या कमतरतेमुळे मराठवाड्यातील पिके अक्षरशा कोमेजून गेली आहेत यामुळे या पिकांना वरुणराजाची साथ मिळणे अतिशय आवश्यक आहे. यामुळे पंजाब रावांनी वर्तवलेला आपला हा सुधारित अंदाज मराठवाड्यातील शेतकरी बांधवांना एक नवीन आशा देणारा ठरणारा आहे.
निश्चितच पंजाबराव यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पाऊस कोसळला तर मराठवाड्यातील खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे. याशिवाय अतिवृष्टीची देखील शक्यता पंजाबराव यांनी वर्तवली असल्याने अतिवृष्टी झाल्यास निश्चितच शेतकरी बांधवांचे नुकसान देखील होऊ शकते. यामुळे पंजाब रावांचा हा नवीन अंदाज कही खुशी तो कही गम या प्रमाणेच भासत आहे.