Panjabrao Dakh : पंजाबरावाचा हवामान अंदाज! ‘या’ तारखेपर्यंत पावसाची उघडीप, मात्र ‘या’ तारखेला पुन्हा राज्यात मुसळधारा

Ajay Patil
Published:
panjabrao dakh

Panjabrao Dakh : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यात पावसाची (Rain) उघडीप आहे, तर काही जिल्ह्यात अजूनही पावसाची (Monsoon News) संततधार सुरूच आहे. राज्यात सध्या कोकण आणि विदर्भात तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस (Monsoon) कोसळत आहे.

दरम्यान आज विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे, उर्वरित राज्यात मात्र तुरळक ठिकाणी हलका पाऊस बरसणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. दरम्यान आपल्या अचूक हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाणारे नाव म्हणजेच हवामानतज्ञ पंजाबराव डख यांचादेखील हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) आला आहे.

पंजाब रावांनी वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, आज 25 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट राज्यात पावसाची उघडीप राहणार आहे. 27 तारखेपर्यंत राज्यात कडक सूर्यदर्शन होणार असल्याचे पंजाबराव (Panjabrao Dakh News) यांनी नमूद केले आहे. मात्र या कालावधीत जोरदार स्वरूपाचे वारे देखील वाहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सत्तावीस तारखेनंतर हवामानात अचानक बदल होणार असून 28 तारखेला राज्यातील लातूर नांदेड या दोन मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे.

याव्यतिरिक्त 28 ऑगस्ट रोजी विदर्भात देखील जोरदार पावसाची शक्यता असल्याचे डख यांनी नमूद केले आहे. त्यानंतर मात्र एकदा राज्यात 31 तारखेपर्यंत पावसाची उघडीप राहणार आहे. 31ऑगस्टपासून ते 3 सप्टेंबर पर्यंत राज्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे. पंजाबराव यांच्या मते 31 ऑगस्ट अर्थात गणेशोत्सव प्रारंभ होण्याचा दिवस, श्रीच्या आगमनाचा दिवस असल्याने या दिवसापासून राज्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळणार असून 3 सप्टेंबर पर्यंत राज्यात पाऊस कायम राहणार आहे.

अशा परिस्थितीत पंजाबराव डख यांनी शेतकरी बांधवांना (Farmer) जेव्हा पावसाची उघडीप असेल त्यावेळी शेतीची कामे करण्याचा सल्ला दिला आहे. शेतकरी बांधवांची ठिकाणी काही कडधान्य पिके (Pulses) शेवटच्या टप्प्यात असून काही शेतकरी बांधवांनी कडधान्य पिकांची काढणी देखील सुरू केली आहे. या परिस्थितीत डख साहेबांनी शेतकरी बांधवांना कडधान्य पिकांची काढणी झाली असेल तर सुरक्षित ठिकाणी शेतमाल ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe