Panjabrao Dakh : दुसऱ्या चरणातील मान्सूनच्या (Monsoon) पावसाने (Rain) जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यात महाराष्ट्रातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र होते. त्यावेळी विदर्भात पावसाचा (Monsoon News) सर्वाधिक जोर बघायला मिळाला होता.
यामुळे विदर्भातील नव्हे-नव्हे तर संपूर्ण राज्यातील खरीप हंगामातील (Kharif Season) पिके पाण्याखाली गेली होती. परिणामी शेतकऱ्यांना (Farmer) मोठा आर्थिक भुर्दंड बसला होता. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने (Maharashtra Rain) कमालीची उघडीप दिली आहे. ऑगस्ट महिन्याचा दुसरा पंधरवडा राज्यात पावसाविनाच (Maharashtra Weather) गेला आहे.
यामुळे ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसामुळे पिकांची नासाडी होत होती तर आता ऑगस्ट महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यात पावसाच्या कमतरतेमुळे पिके करपत असल्याचे चित्र आहे. यामुळे राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधव पावसाची वाट पाहत आहेत. मराठवाड्यातील बहुतांशी भागात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली असल्याने तेथील शेतकरी बांधवांना याचा मोठा फटका बसत आहे.
दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी (Weather Update) संपूर्ण महाराष्ट्रात ओळखलं जाणारं व्यक्तिमत्व अर्थातच परभणी भूमिपुत्र पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) समोर आला आहे. पंजाबरावांच्या (Panjabrao Dakh News) मते हवामानात मोठा बदल झाला असून राज्यात येत्या काही दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
राज्यात 31 ऑगस्ट पासून पावसाचा जोर वाढणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. म्हणजेच राज्यात गणरायाच्या आगमन झाले की पावसाला सुरुवात होईल असा अंदाज पंजाबराव (Panjab Dakh Weather Report) यांनी बांधला आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या भुवया उंचावल्या असून खरीप हंगामातील करपत असलेल्या पिकांना यामुळे नवसंजीवनी मिळणार आहे. पंजाबराव यांच्या मते 31 ऑगस्ट ते सहा सप्टेंबर पर्यंत राज्यातील अनेक भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे. राज्यात गणरायाच्या आगमनापासून सुरू होणारा पाऊस सहा सप्टेंबर पर्यंत कायम राहणार आहे.
‘या’ जिल्ह्यात कोसळणार पाऊस
पंजाब राव यांच्या मते, सांगली, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, बुलढाणा, अमरावती, अकोला, जालना, छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर, सातारा, बीड या जिल्ह्यांत सहा सप्टेंबर पर्यंत पावसाची शक्यता आहे. म्हणजेच राज्यात कोसळणारा पाऊस पूर्व विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश जवळपास राज्यातील सर्वच विभागात कायम राहणार आहे.