Panjabrao Dakh : ब्रेकिंग! हवामानात अचानक झाला बदल! आजपासून ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरवात, वाचा काय म्हणताय पंजाबराव डख

Ajay Patil
Published:
panjabrao dakh

Panjabrao Dakh : मान्सूनचा (Monsoon) दुसऱ्याच्या चरणातील पावसाने (Monsoon News) जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अक्षरशा थैमान माजलं होतं. मात्र गेल्या पंधरवड्यापासून राज्यात पावसाने (Rain) उघडीप दिली आहे.

मात्र असे असले तरी विदर्भातील पूर्व भागाकडे तसेच कोकणातील काही जिल्ह्यात आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावरील काही भागात पावसाची (Maharashtra Rain) संततधार सुरूच आहे. मात्र असे असले तरी राज्यातील बहुतांशी भागात आता गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असल्याने खरीप हंगामातील पिके सुकत असल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकरी बांधव पुन्हा एकदा पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.

दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी शेतकऱ्यांमध्ये कायमचं चर्चिले जाणारे पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) समोर आला आहे. पंजाबराव (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार आज पासून राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे.

हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे 29 तारखे पासून सुरू होणारा पाऊस 6 सप्टेंबर पर्यंत राज्यात कायम राहणार असल्याचा पंजाबरावांनी अंदाज वर्तवला आहे. पंजाबराव यांच्या मते 31ऑगस्ट रोजी श्रींचे अर्थात गणरायांचे आगमन होत असल्याने 31 तारखेपासून पावसाचा जोर अजूनच वाढणार आहे. पंजाब राव यांच्या मते सहा सप्टेंबर पर्यंत राज्यातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्र सर्वत्र पावसाची हजेरी राहणार आहे.

6 सप्टेंबरपर्यंत या भागात कोसळणार पाऊस 

परभणी भूमिपुत्र हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या आपल्या नवीन 6 सप्टेंबर पर्यंत च्या हवामान अंदाजानुसार, पश्चिम महाराष्ट्रातील द्राक्षे पंढरी नाशिक, अहमदनगर, सातारा आणि सांगली या चार जिल्ह्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असून या चार जिल्ह्यात 31 तारखेपासून ते 5 सप्टेंबर पर्यंत पाऊस कोसळणार आहे.

याशिवाय उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता पंजाबराव यांनी वर्तवली आहे. तसेच बुलढाणा, अमरावती, अकोला, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड या जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. निश्चितच राज्यात आगामी काही दिवस पावसाचे सत्र सुरू राहणार असून यामुळे शेतकरी बांधवांना तूर्तास तरी दिलासा मिळणार आहे.

मित्रांनो खरे पाहता गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यात पावसाने उघडीप दिली असल्याने खरीप हंगामातील पिके बऱ्याच ठिकाणी करपत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत पंजाब रावांनी वर्तवलेला अंदाज शेतकऱ्यांसाठी सुखद अनुभव देणारा ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe