Panjabrao Dakh : पंजाबरावांचा हवामान अंदाज..! आगामी काही दिवस असं राहणार हवामान, ‘या’ भागात पडेल पाऊस

Ajay Patil
Published:
panjabrao dakh

Panjabrao Dakh : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने (Rain) उघडीप दिली आहे. यामुळे राज्यात सर्वत्र शेती कामाला वेग आला आहे.

राज्यातील विदर्भात तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर तुरळक ठिकाणी पाऊस (Monsoon News) सुरू असला तरी देखील उर्वरित राज्यात पावसाने (Monsoon) मात्र उघडीप दिल्याने शेतकरी बांधव आता पिक व्यवस्थापन करण्याकडे वळले आहेत. दरम्यान परभणीचे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) समोर आला आहे.

पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजात त्यांनी सप्टेंबर महिन्यात हवामान कसं असेल आणि कधी पाऊस पडेल याविषयी माहिती दिली आहे. पंजाबराव यांच्या मते आज पासून 27 तारखेपर्यंत पावसाची उघडीप राहील मात्र या कालावधीत राज्यात जोराचे वारे वाहणार आहेत.

सत्तावीस तारखे नंतर 28 तारखेला लातूर, नांदेड विदर्भ या ठिकाणी जोरदार स्वरूपाची पावसाची देखील शक्यता पंजाब राव यांनी वर्तवली आहे. त्यानंतर मात्र सर्वत्र पाऊस काही काळ विश्रांती घेणार आहे. 31 ऑगस्टपर्यंत राज्यात सर्वत्र पावसाची विश्रांती राहणार आहे. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल होणार असल्याचे पंजाबराव यांनी नमूद केले आहे.

पंजाबराव यांच्यामते सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यात पावसाचे वातावरण राहणार असून 31 ऑगस्ट पासून ते तीन सप्टेंबर पर्यंत राज्यात सर्वत्र पाऊस राहणार आहे. पंजाबराव यांनी शेतकरी बांधवांना हवामान अंदाजा बरोबरच सल्लादेखील जारी केला आहे.

पंजाबराव यांच्या मते ज्या शेतकरी बांधवांची मूग पीक काढणीसाठी आले असेल त्यांनी लवकरात लवकर याची काढणी करून घ्यावी आणि सुरक्षित ठिकाणी त्याचे स्थलांतर करावे किंवा बाजारात जाऊ द्यावे. एवढेच नाही तर शेतकरी बांधवांनी 31 तारखेपर्यंत शेती मधील सर्व कामे करून घेण्याचा प्रयत्न करावा. कारण की एक तारखे नंतर हवामानात बदल होणार आहे यामुळे शेतकरी बांधवांना शेतीची कामे करता येणार नाहीत. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe