Panjabrao Dakh : राज्यात गेल्या काही दिवसापासून पावसाला (Rain) पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या पाऊस (Monsoon) सुरू असून काही ठिकाणी पावसाने (Monsoon News) मात्र उघडीप दिली आहे.
दरम्यान, राज्यातील अनेक ठिकाणी खरीप हंगामातील पिकांना आता पावसाची (Maharashtra Rain) आवश्यकता आहे. यामुळे शेतकरी बांधव पावसाची आतुरतेने वाट पाहत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता असल्याचे स्पष्ट केले आहे.
पुढील पाच दिवसात या संबंधित विभागात जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे. पुढील तीन ते चार दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळणार असून गुरुवारपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभाग सांगत आहे.
या दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाणारे पंजाबराव डख यांचादेखील हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) जारी झाला आहे. पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यात 18 सप्टेंबरपर्यंत पावसासाठी पोषक वातावरण आहे.
राज्यात 18 सप्टेंबर पर्यंत अनेक विभागात पाऊस कोसळणार असल्याचे पंजाबरावं यांनी नमूद केले आहे. पंजाब रावांच्या मते, राज्यातील अनेक जिल्ह्यात भाग बदलत या कालावधीत पाऊस पडणार आहे. तसेच या कालावधीत कोसळणारा पाऊस विजांच्या कडकडाटासह कोसळणार असल्याने शेतकरी बांधवांना काळजी घेण्याचे आवाहन देखील या वेळी डख यांनी केले आहे.
तसेच, पंजाबराव डख यांच्या मते 8, 9 आणि 10 सप्टेंबर रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी होणार आहे. यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांना हे तीन दिवस विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. निश्चितच राज्यात 18 सप्टेंबर पर्यंत पावसाची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे.
मात्र यासोबतच राज्यात अतिवृष्टी होणार असल्याने शेतकरी बांधवांची चिंता देखील वाढणार आहे. पंजाबराव यांच्या मते, या कालावधीत कोसळणारा पाऊस हा विजांच्या कडकडाटासह कोसळणार असून अनेक ठिकाणी विज पडण्याच्या घटना देखील घटण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी आपली तसेच आपल्या पशुधनाची या कालावधीत विशेष काळजी घ्यावी.