Panjabrao Dakh : आताची सर्वात मोठी बातमी! ऑक्टोबरमध्ये या दिवशी कोसळणार पाऊस, पंजाबराव डख यांचा इशारा

Ajay Patil
Published:
panjabrao dakh

Panjabrao Dakh : मित्रांनो राज्यात सध्या परतीचा पाऊस (Rain) सुरू आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात परतीचा पाऊस (Monsoon) धुमाकूळ घालत असल्याचे चित्र आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने आगामी काही दिवस पावसाचेचं राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीनुसार आज राज्यातील ठाणे, नासिक अहमदनगर पुणे सांगली सातारा कोल्हापूर कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाची (Monsoon News) शक्यता आहे.

या अनुषंगाने भारतीय हवामान विभागाकडून संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे संबंधित जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाच्या मते चार आणि पाच ऑक्टोबर रोजी राज्यात पावसाची शक्यता आहे. या दोन दिवसात राज्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळणार असून भारतीय हवामान विभागाने या दोन दिवसासाठी देखील येलो अलर्ट जारी केला आहे. 

4 ऑक्टोबरला राज्यातील नांदेड, परभणी, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता लक्षात घेता भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय 5 ऑक्टोंबर रोजी परभणी नांदेड आणि विदर्भात पावसाची शक्यता लक्षात घेता या विभागाला देखील भारतीय हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. निश्चितच आगामी काही दिवस राज्यात पावसाची शक्यता असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणजेच पंजाबराव डख यांनी आपला नवीन हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) सार्वजनिक केला आहे. पंजाबराव (Panjabrao Dakh News) यांनी हवामान विभागाच्या विरुद्ध अंदाज वर्तवला आहे. पंजाबराव यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार राज्यात 7 ऑक्टोबर पर्यंत पावसाची उघडीप राहणार आहे.

या कालावधीत राज्यात कडक ऊन पडणार असल्याचे पंजाबराव यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ऑक्टोबर मध्ये राज्यात हा पाऊस होणार नसल्याचे पंजाबराव यांनी स्पष्ट केले आहे. मात्र 14 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. याशिवाय राज्यात 28 ऑक्टोबर पासून थंडीला सुरुवात होणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे.

मित्रांनो निश्चितच आगामी काही दिवसात राज्यात हवामान कोरडे होणार असून आता शेती कामाला वेग येणार आहे. दरम्यान राज्यातील काही भागात खरीप हंगामातील पिकांची देखील काढणी प्रगतीपथावर येणार आहे. शिवाय आता रब्बी हंगामासाठी शेतकरी बांधव तयारी करणार असल्याचे दृश्य आहे. जाणकार लोकांच्या मते सध्या कोसळत असलेला परतीचा पाऊस रब्बी हंगामासाठी विशेष लाभदायी ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe