Panjabrao Dakh : मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस (Rain) कोसळत आहे. यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळित झाले आहे तर काही ठिकाणी पावसामुळे (Monsoon News) खरीप हंगामातील पिकांना मोठी नवसंजीवनी मिळाली आहे.
मात्र अजून परतीच्या पावसाला (Maharashtra Rain) सुरुवात झाली नसल्याचे हवामान तज्ञ नमूद करत आहेत. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की दरवर्षी परतीच्या पावसाची (Monsoon) सुरुवात 17 सप्टेंबर पासून राज्यात होत असते.

मात्र या वर्षी परतीच्या पावसाला उशिरा सुरुवात होणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान पंजाबराव डख यांनीदेखील परतीच्या पावसासंदर्भात एक महत्त्वाच अपडेट दिल आहे. आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या नावाचा ठसा उमटवणाऱ्या पंजाब डख यांच्या नवीनतम हवामान अंदाजानुसार (Panjabrao Dakh Havaman Andaj), आजपासून राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. 17 ते 20 तारखेपर्यंत राज्यात पाऊस पडणार आहे.
मात्र तुरळक ठिकाणी पाऊस पडेल आणि पावसाचा जोर कमी राहणार आहे. त्यानंतर मात्र राज्यात एकदा पावसाला सुरुवात होणार आहे 21 ते 24 सप्टेंबर पर्यंत राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार आहे. दरम्यान ऑक्टोबर महिन्यात देखील दोन मुसळधार पाऊस पडणार असल्याचे पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) यांनी नमूद केले आहे.
दिवाळीला राज्यातील विदर्भ मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात मोठा पाऊस पडणार असल्याचे सांगितले जात आहे. निश्चितच या संबंधित जिल्ह्यातील लोकांना या वर्षी दिवाळी पावसातच साजरी करावी लागणार आहे. शिवाय पंजाबराव डख यांनी आपल्या नवीन अंदाजात परतीच्या पावसा संदर्भात मोठी भविष्यवाणी केली.
पंजाबराव यांच्या मते या वर्षी परतीचा पाऊस ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार आहे. 7 ऑक्टोबर रोजी यावर्षी परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे. निश्चितच यावर्षी परतीचा पाऊस तब्बल 15 दिवस उशिरा जाणार असल्याचे समजत आहे. शिवाय संदर्भात देखील पंजाबराव डख यांनी एक बहुमूल्य माहिती दिली आहे. पंजाबराव डख यांच्या मते या वर्षी थंडीला 28 ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे.
निश्चितच पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या आपल्या नवीनतम सुधारित हवामान अंदाजात काही बहुमूल्य माहिती समाविष्ट केली आहे. सरते शेवटी पंजाबराव यांनी शेतकरी बांधवांचे नुकसान होऊ देणार नाही आणि हवामानात अचानक बदल झाला पावसाचे वातावरण तयार झाले किंवा हवामानात अन्य काही बदल झाला तर शेतकरी बांधवांना सुचित केले जाईल असे आश्वासन देखील यावेळी दिले आहे.