Panjabrao Dakh : पाऊस गेला भो! ‘या’ तारखेपर्यंत राज्यात पावसाची उघडीप, पण ‘या’ दिवशी होणार पावसाचा कमबॅक : पंजाबराव डख

Ajay Patil
Published:
panjabrao dakh

Panjabrao Dakh : गेल्या काही वर्षांपासून परभणी जिल्ह्यातील धामणगाव हुगळी येथील हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) शेतकऱ्यांमध्ये मोठा लोकप्रिय होत आहे.

शेतकऱ्यांच्या मते पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) यांचा हवामान अंदाज त्यांच्यासाठी उपयोगाचा ठरत आहे. अशा परिस्थितीत आम्ही रोजच पंजाबराव डख यांचा सुधारित हवामान अंदाज (Panjab Dakh Weather Report) शेतकरी वाचक मित्रांसाठी घेऊन येत असतो.

मित्रांनो पंजाबराव डख यांनी नुकताच आपला नवीन सुधारित हवामान अंदाज सार्वजनिक केला आहे. पंजाबरावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, 26 सप्टेंबर पर्यंत राज्यात सर्वत्र पावसाची (Rain) उघडीप राहणार आहे. या दरम्यान राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. मात्र काही ठिकाणी स्थानिक हवामानात बदल होऊन पावसाची शक्यता आहे.

अशा परिस्थितीत या कालावधीत शेतकरी बांधवांनी शेतीची कामे करून घ्यावीत. मित्रांनो जस की आपणास ठाऊकचं आहे की, सप्टेंबर महिन्यात दुसऱ्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतीकामे चांगलीच रखडलेली आहेत. अशा परिस्थितीत आता पावसाने उघडीप दिली असल्याने राज्यात शेतीकामाला चांगला वेग येणार आहे.

मित्रांनो, राज्यात 27 सप्टेंबर पासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे. 27 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान राज्यात रिमझिम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. या कालावधीत राज्यात पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र या विभागात पाऊस राहणार आहे. जिल्हानिहाय विचार केला तर या कालावधीत राज्यातील नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी अकोला वाशिम छत्रपती संभाजी महाराज नगर जालना लातूर धाराशिव सोलापूर सातारा सांगली व अहमदनगर या दिव्यात रिमझिम स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे.

मित्रांनो जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेती पिकांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे राज्यातील प्रमुख धरणे देखील 100% क्षमतेने भरली आहेत. आता मान्सून (Monsoon News) देखील अंतिम टप्प्यात आला आहे. आगामी काही दिवसात महाराष्ट्रातून मान्सून अलविदा घेणार आहे.

यावर्षी राज्यात समाधानकारक पाऊस झाला असल्याने उन्हाळी हंगामात पाण्याची चणचण भासणार नसल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. निश्चितच यावर्षी पावसाने शेतकऱ्यांसाठी चांगले काम केले आहे.

दरम्यान राज्यातील काही भागात जास्तीच्या पावसामुळे (Monsoon) शेतीपिकांचे नुकसान देखील झाले आहे. अशा शेतकऱ्यांसाठी शासनाने मदत देखील जाहीर केली आहे. विशेष म्हणजे येत्या काही दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाने जाहीर केलेली मदत देखील वर्ग केली जाणार आहे. यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe