Panjabrao Dakh : पंजाबरावांचा हवामान अंदाज! शेतकऱ्यांनो काळजी घ्या! ‘या’ तारखेला राज्यात ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

Ajay Patil
Published:
panjabrao dakh

Panjabrao Dakh : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची (Rain) उघडीप बघायला मिळत आहे. दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस (Monsoon) देखील होत आहे. राज्यातील विदर्भ तसेच महाराष्ट्रातील घाट माथ्यावर तुरळक ठिकाणी पावसाचा (Monsoon News) जोर कायम राहिला आहे.

या दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी (Weather Update) संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या नावाचा ठसा उमटवणाऱ्या पंजाबराव यांचा हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) समोर आला आहे. पंजाबरावांनी हवामाना संदर्भात एक महत्त्वाची माहिती शेतकरी बांधवांना दिली आहे.

पंजाबराव (Panjabrao Dakh News) यांच्या मते आज आणि राज्यात सर्वत्र पावसाची उघडीप राहणार असून कडक सूर्यदर्शन होणार आहे. मात्र असे असले तरी 28 ऑगस्ट रोजी राज्यातील लातूर आणि नांदेड या मराठवाड्यातील जिल्ह्यात तसेच विदर्भात पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल होणार असून जोरदार स्वरूपाचा पाऊस (Maharashtra Rain) कोसळणार आहे. त्यामुळे विदर्भातील तसेच मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी आज आणि उद्या शेतीतील कामे करून घ्यावीत असा सल्ला पंजाबराव यांनी दिला आहे.

28 तारखेला उर्वरित महाराष्ट्रात मात्र पावसाची उघडीप राहणार आहे. त्यामुळे उर्वरित महाराष्ट्रात शेतकरी बांधवांना शेतीतील कामे करता येणार आहेत. 28 ऑगस्ट नंतर विदर्भ-मराठवाडा सहित सर्व राज्यात पावसाची विश्रांती राहणार आहे. मात्र गणेशोत्सवाच्या प्रारंभी राज्यात पुन्हा एकदा मौसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. म्हणजे 31 तारखेपासून ते 3 सप्टेंबर पर्यंत राज्यात पाऊस राहणार असल्याची शक्यता पंजाबराव यांनी वर्तवली आहे.

अशा परिस्थितीत पावसाची उघडीप बघून शेतकरी बांधवांनी (Farmer) शेतीतील (Farming) कामे करून घ्यावीत. तसेच शेतकरी बांधवांनी या पिकाची आपल्या पशुधनाची आणि स्वतःची काळजी घ्यावी असे देखील आव्हान यावेळी करण्यात आले आहे. खरे पाहता गत महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे खरिपातील बहुतांशी पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे.

दरम्यान ऑगस्ट महिन्यात देखील पहिल्या दोन आठवड्यात मुसळधार पाऊस बघायला मिळाला. मात्र तदनंतर राज्यात पावसाची उघडीप आहे यामुळे काही ठिकाणी हंगामातील पिकांना नितांत पाण्याची आवश्यकता देखील भासत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे काही ठिकाणी पावसाची आवश्यकता आहे तर काही ठिकाणी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांची नासाडी होत असल्याने पीक व्यवस्थापनासाठी शेतकरी बांधव पावसाची उघडीप बघण्याची वाट पाहत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe