Pik Vima: पिक विमा भरा परंतु ‘या’ गोष्टींची काळजी घ्या; शासनाने केले नियमांमध्ये बदल! वाचा बदललेले नियम

Ajay Patil
Published:

Pik Vima:- आपल्याला माहित आहे की रब्बी हंगाम असो किंवा खरीप हंगाम यामध्ये बऱ्याचदा गारपीट किंवा वादळी पाऊस, अवकाळी पाऊस तसेच अतिवृष्टी, जास्तीचे तापमान यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीपिकांचे व फळपिकांचे नुकसान होते व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते.

याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून पिक विमा योजना राबवली जाते व या माध्यमातून शेतकऱ्यांना अशा नुकसानीच्या काळामध्ये आर्थिकदृष्ट्या आधार मिळतो. पंतप्रधान पिक विमा योजना ही एक महत्त्वाची योजना आहे. परंतु आता या योजनेसाठी अर्ज भरताना काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

यामध्ये सरकारने आता काही बदल केलेले आहेत व ते बदल प्रामुख्याने मागच्या वर्षीचे काही पिक विमा योजनेमध्ये गैरप्रकार आढळून आले त्या पार्श्वभूमीवर घेतल्याचे सांगितले जात आहे. पिक विमा योजनेमध्ये मानवी हस्तक्षेप कमी करून तंत्रज्ञानाचा जास्तीचा वापर करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून पिक विमा योजना आधार संलग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पीक विमा योजने सरकारच्या माध्यमातून करण्यात आले हे बदल

1- पीक विम्याचा अर्ज भरा परंतु आधार कार्ड वरील नावाप्रमाणेच यामध्ये सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आला आहे की शेतकरी जेव्हा पिक विमाचा अर्ज भरतील तेव्हा तो अर्ज भरताना शेतकऱ्याचे आधार कार्डवर ज्याप्रमाणे नाव आहे त्या नावाप्रमाणेच अर्ज भरणे गरजेचे आहे. म्हणजे जर आधार कार्डवर तुमच्या नावाची सुरुवात आडनावाने होत असेल तर पिक विम्यासाठी अर्ज भरताना नाव लिहिताना ते आडनावाने सुरुवात करून लिहावे.

जर आधार कार्ड वर नावाने सुरुवात असेल तर अर्जामध्ये देखील तसेच नाव लिहावे. हा एक महत्त्वाचा बदल सरकारच्या माध्यमातून करण्यात आला आहे. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे ज्याप्रमाणे आधार वर नाव आहे त्याप्रमाणेच अर्जावर नाव लिहिणे गरजेचे आहे. जर अशा पद्धतीने नाव लिहिले नाही तर अर्ज रद्द होऊ शकतो.

2- सातबारा आणि आधारवरील नाव सारखे असणे  शेतीचा सातबारा आणि आधार वर असलेले नाव सारखे असणे गरजेचे आहे. त्यामध्ये अनेक प्रकारचे जे काही शासनाचे अनुदान शेतकऱ्यांसाठी येतात ते शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होत आहेत. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे आधार वरील नावे आणि सातबारा वरील नाव हे सारखेच आहे.

परंतु जर काही शेतकऱ्यांची याबाबत काही समस्या असेल किंवा सातबारा  व आधार कार्ड वरील नाव वेगळे असतील तर असे शेतकरी गॅझेट आणि शपथपत्र देऊन सातबारावरील नाव आधार प्रमाणे करू शकतात. यामध्ये बऱ्याचदा वयस्कर व्यक्तींचा थंब म्हणजे अंगठा आधार घेत नाही व त्यामुळे प्रश्न निर्माण होऊ शकतो. ही समस्या प्रामुख्याने आधारची आहे.

परंतु यामध्ये सातबारा आणि आधार कार्डवर असलेल्या नावात जर थोडाफार बदल असेल किंवा पूर्ण बदल नसेल तर काहीही समस्या येणार नाही. परंतु संपूर्ण नावच वेगळे असेल तर मात्र ते बदलायला हवे असे कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे.

3- सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेला तिसरा बदल म्हणजे बँक पासबुक च्या संबंधित आहे. जेव्हा पिक विम्यासाठी अर्ज भराल तेव्हा तो भरताना आधार लिंक बँक खाते असलेला नंबर देणे गरजेचे आहे. त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी बँकेमध्ये केवायसी केलेले आहे अशा जवळपास सर्व शेतकऱ्यांचे नाव हे आधार कार्ड प्रमाणेच आहे. त्यामुळे बँक पासबुक वरील नावाची अडचण उद्भवणार नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांनी पिक विम्यासाठी अर्ज भरताना या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe