Punganur Cow: ही गाय 5 किलो चारा खाऊन देते 5 लिटर दूध! वाचा या गाईचे महत्वाची वैशिष्ट्ये

Ajay Patil
Published:
pungnur cow

Punganur Cow:- भारतात पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो व पशुपालनामध्ये प्रामुख्याने गाय व म्हशीचे पालन मोठ्या प्रमाणावर केले जाते. परंतु जर आपण गाई पालनाच्या अनुषंगाने विचार केला तर विविध प्रजातीच्या गाई भारतामध्ये पाळल्या जातात. जर आपण यामध्ये विचार केला तर विविध प्रकारच्या देशी गाई जसे की, गिर गाईंचे पालन देखील मोठ्या प्रमाणावर केले जाते.

तसेच संकरित गाईंमध्ये एचएफ म्हणजेच होलस्टीन फ्रिजियन आणि जर्सी, स्विस ब्राऊन सारख्या गाई भारतात तसेच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पाळल्या जातात. यामध्ये प्रत्येक प्रजातीची दूध देण्याची वैशिष्ट्ये व इतर शारीरिक रचना वेगवेगळ्या असतात. या व्यतिरिक्त जर आपण अतिशय दुर्मिळ असलेली व शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर अशा पुंगनूर जातीच्या गाईचा विचार केला तर ही शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर अशी गाईची जात आहे. याच गाईचे माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

 पुंगनूर गाय तिची माहिती

देशाचा विचार केला तर 50 देशी गाईच्या जाती भारतात आढळून येतात व यामध्ये अतिशय दुर्मिळ असलेली व शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर असलेली पुंगनूर जातीची गाय शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आणि फायदेशीर आहे. या गाईचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे याची उंची फक्त तीन ते साडेतीन फुट इतके असते व ही गाय आंध्र प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येते.

उंचीने कमी असलेल्या या गाईचे व्यवस्थापन जर योग्य रीतीने केले तर तीन ते पाच लिटर पर्यंत आरामात दूध देण्याची क्षमता या गाईत आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हिचा आकार अगदी छोटा असल्यामुळे साहजिकच तिला खायला चारा देखील खूप कमी लागतो. त्यामुळे आता बरेच शेतकरी पुंगनूर जातीच्या गाई पालनाकडे वळताना दिसून येत आहे.

 पुंगनूर जातीच्या गायीच्या दुधाचे वैशिष्ट्ये

या गायीचे दूध हे उत्तम असते व यातील स्निग्धांशाचे प्रमाण जास्त असल्यामुळे तिचा फॅट देखील चांगला असतो. त्यामुळे या जातीच्या गाईच्या दुधाला दर देखील चांगले मिळतात. साधारणपणे पुंगनूर जातीच्या गायीच्या दुधाचा फॅट हा तिन ते साडेतीन पर्यंत असतो. परंतु बऱ्याचदा या गायीच्या दुधाचा फॅट आठ पर्यंत देखील जातो असे देखील जाणकार सांगतात.

दीड ते तीन फूट पर्यंत उंची असलेल्या या गाईचे वजन 100 ते 150 किलो पर्यंत असते. आकारमान कमी असल्यामुळे चाऱ्यावरचा खर्च देखील कमी लागतो व त्यामानाने दूध चांगले देतात त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही गाय खूप फायदेशीर आहे. साधारणपणे एका दिवसाला पाच किलो चारा खाऊन पाच लिटर दूध देण्याची क्षमता या गाईची आहे.

 या गाईचे किंमत आणि इतर महत्त्वाचे वैशिष्ट्ये

पुंगनूर जातीची गाय तुम्हाला 40000 रुपयांमध्ये देखील मिळू शकते. साधारणपणे दोन गाई तुम्हाला 80 हजार ते एक लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीत मिळू शकतात. तसेच महत्त्वाचे म्हणजे या गाईचे शेण आणि गोमूत्र  त्याला कुठल्याही प्रकारचा वास येत नसल्यामुळे अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये वापर केला जातो. तसेच या गाईचे शेण आणि गोमूत्र आयुर्वेदिक असल्याचे देखील म्हटले गेले आहे. अतिशय शांत असल्यामुळे कोणीही या गाईचे देखरेख आरामात करू शकते. त्यामुळे पुंगनूर जातीचे गाय हे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe