पुरंदरचे ‘फुले पुरंदर’ जातीचे सिताफळ गाजवत आहे अरब देशांचे मार्केट! पुरंदर हायलँड्स कंपनीने केली सीताफळाची यशस्वीरित्या निर्यात

पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांचा विचार केला तर या ठिकाणीचे प्रसिद्ध असे सीताफळ आता शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून विदेशातील सुपर मार्केटमध्ये निर्यात करण्यात आले आहे व त्या ठिकाणी ते ग्राहकांना प्रचंड प्रमाणात पसंतीस पडले आहे.

Published on -

Phule Purandar custard Apple:- फळबाग लागवडीमध्ये आता महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रगती केली असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि योग्य व्यवस्थापनाची जोड देऊन भरघोस आणि निर्यातक्षम असे दर्जेदार फळांचे उत्पादन मिळवण्यामध्ये शेतकरी आता यशस्वी झाले आहेत.

त्यामुळे आपल्याकडील फळे आता आखाती व इतर देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर आता निर्यात केले जात असून या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे आर्थिक नफा मिळत आहे.

याचप्रमाणे जर आपण पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांचा विचार केला तर या ठिकाणीचे प्रसिद्ध असे सीताफळ आता शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून विदेशातील सुपर मार्केटमध्ये निर्यात करण्यात आले आहे व त्या ठिकाणी ते ग्राहकांना प्रचंड प्रमाणात पसंतीस पडले आहे. त्यामुळे पुरंदर तालुक्यातील सिताफळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही एक खूप मोठी उपलब्धी व संधी असून येणाऱ्या कालावधीमध्ये सिताफळ उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार हे मात्र निश्चित.

 पुरंदरचे फुले पुरंदर हे सिताफळ आहे प्रसिद्ध

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात असलेले त्या ठिकाणाचे सीताफळाचे स्थानिक वाण फुले पुरंदर म्हणून ओळखले जाते व हे सीताफळाचे वाण खूप प्रसिद्ध आहे. सीताफळाच्या निर्यातीच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितले तर सिताफळाची तोडणी झाल्यानंतर ते जास्त काळ टिकत नाही व त्यामुळे त्याचे निर्यात खूप कमी प्रमाणात होत असते.

या कारणामुळे पुरंदर तालुक्यामध्ये सीताफळाचा गर काढण्याचे अनेक उद्योग तालुक्यात उभे राहिले आहेत व या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे.

परंतु पुरंदर हायलँड्स ही शेतकरी उत्पादक कंपनी आणि सायऑन ॲग्रीकॉस या आंतरराष्ट्रीय कंपनी मिळून फुले पुरंदर सीताफळाची अरब देशांमध्ये निर्यात केली असून अगदी ताज्या स्वरूपातले सीताफळ अरब देशातील सुपर मार्केटमध्ये पाठवण्याचा हा पहिलाच प्रयोग केला व हा यशस्वी झाला.

या पहिल्या प्रयोगामध्ये जवळपास 600 किलो सीताफळाची निर्यात करण्यात आली आहे. अरब देशातील विविध सुपर मार्केट आणि प्रीमियम स्टोअर मध्ये या सिताफळाची विक्री केली गेली आणि तेथील ग्राहकांना देखील ते खूप आवडले असल्यामुळे त्याला मागणी देखील चांगली आहे.

या सिताफळाची गोडी तसेच चव व प्रत पाहून त्या ठिकाणाच्या खरेदीदारांनी ऑर्डर देखील दिल्या असून येणाऱ्या काळात आता पुरंदर सीताफळाची निर्यात वाढेल यात मात्र शंका नाही.

 पुरंदर हायलँड कंपनीने बनवला आहे अंजिराचा जगातील पहिला ज्यूस

पुरंदर हायलँड ही पुरंदर तालुक्यातील एक प्रसिद्ध अशी शेतकरी उत्पादक कंपनी असून या कंपनीने पुरंदर येथील भौगोलिक मान्यताप्राप्त अंजिराचा जगातील पहिला ज्यूस बनवला व इतकेच नाही तर त्याचे पेटंट देखील मिळवले. या कंपनीने अंजिराचे हे ज्यूस जगातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या एक्सपोमध्ये देखील सादर केले व त्यानंतर मात्र ग्राहकांचा याला उदंड प्रतिसाद मिळाला.

दुबई येथे झालेल्या गल्फफूड ग्रीन या प्रदर्शनामध्ये देखील सिताफळ आणि अंजिराचा ज्यूस सादर करण्यात आला होता व त्यावेळीच त्या ठिकाणाहून सीताफळाच्या ऑर्डर मिळाली आणि पहिल्या टप्प्यात 600 किलो सीताफळाची यशस्वीरित्या निर्यात करण्यात आली आहे.

अशा पद्धतीने पुरंदर हायलँड्स कंपनीच्या माध्यमातून आता परदेशातील सुपर मार्केटमध्ये सिताफळ निर्यात होत असल्यामुळे येथील सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच आर्थिक दृष्टिकोनातून खूप मोठा फायदा होईल यामध्ये तीळमात्र शंका नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News