वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान !

Published on -

Agricultural News : आश्वी व परिसरातील गावांमध्ये रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले असून ७६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

तसेच काल सोमवारी सकाळी पुन्हा पावसाने झोडपून काढल्याने आठवडे बाजाराकडे शेतकरी व भाजीपाला व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र होते.

रविवार सकाळपासून आश्वी परिसरात ढगाळ वातावरण होते. सायंकाळी चार वाजेचा सुमारास आचानक वातावरणात बदल होत तापमानात वाढ झाली व आकाश काळ्याभोर ढगांनी झाकून गेले.

काही वेळातच जोरदार वादळासह पावसास सुरवात झाली. सुरवातीला सुमारे एक तास चाललेल्या पावसाने परिसरातील व्यापारी, शेतकरी व नागरीकांची चांगलीच धांदल उडाली होती.

त्यानंतर रात्री उशिरापर्यंत दमदार पाऊस सुरु होता. सखल भागातील शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. या पावसाने रब्बी हंगामातील पिकांचा पेरण्या लांबणीवर पडणार आहे. काढणीस आलेल्या कपाशी, कांदा, मका पिकांची नुकसान झाल्याची माहिती अनेक शेतकऱ्यांनी दिली.

सगळीकडे पाणी-पाणी झाल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात जिर्ण झालेल्या वीजेच्या तारा तुटल्याने वीज प्रवाह खंडीत झाला होता.

काल सोमवारी सुध्दा सकाळपासून सर्वत्र ढगाळ वातावरण होते. सकाळीच नऊ वाजेच्या सुमारास जोरदार पावसाने सुरवात केली. या पावसामुळे सोमवारच्या आठवडे बाजाराकडे भाजीपाला व्यापारी, शेतकरी व ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळे पालेभाज्याचे भाव पडल्याचे चित्र होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News