रमेश अण्णांनी कमावला आले पिकातून एकरी 11 लाखांचा नफा! दीड एकर आले लागवडीतून कसे केले शक्य? वाचा यशोगाथा

फलटण तालुक्यात असलेल्या पाडेगावचे प्रयोगशील शेतकरी रमेश विठ्ठल अडसूळ यांची यशोगाथा पाहिली तर ती या मुद्द्याला साजेशी आहे. या प्रयोगशील शेतकऱ्याने दीड एकर आले लागवड केली व योग्य व्यवस्थापन ठेऊन 45 टन उत्पादन घेत एकरी अकरा लाखापेक्षा अधिकचा नफा  मिळवण्यात यशस्वी झालेले आहेत.

Ajay Patil
Published:
ginger crop

बाजारपेठेचा अभ्यास आणि बाजारपेठेत असलेली मागणी या अनुषंगाने केलेली पिकांची लागवड शेतकऱ्यांना नक्कीच फायद्याची ठरते. विकेल तेच पिकेल या धर्तीवर जर शेतकऱ्यांनी पिकांच्या लागवडीचे नियोजन केले तर बाजारभाव घसरणीचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता खूपच कमी होऊ शकते.

तसे पाहायला गेले तर सद्यस्थितीत शेतकरी अशाच पद्धतीने पिकांच्या लागवडीचे नियोजन करून कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील लाखो रुपयांची कमाई करण्यामध्ये यशस्वी होताना आपल्याला दिसून येत आहेत.

अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण फलटण तालुक्यात असलेल्या पाडेगावचे प्रयोगशील शेतकरी रमेश विठ्ठल अडसूळ यांची यशोगाथा पाहिली तर ती या मुद्द्याला साजेशी आहे. या प्रयोगशील शेतकऱ्याने दीड एकर आले लागवड केली व योग्य व्यवस्थापन ठेऊन 45 टन उत्पादन घेत एकरी अकरा लाखापेक्षा अधिकचा नफा  मिळवण्यात यशस्वी झालेले आहेत.

 आले पिकातून मिळवला एकरी अकरा लाखांचा नफा

याबाबत सविस्तर वृत्त असे की, फलटण तालुक्यातील पाडेगावचे शेतकरी रमेश विठ्ठल अडसूळ यांनी शेतीला आधुनिकतेची जोड देण्याचा निश्चय केला व त्यानुसार त्यांचा असलेला परंपरागत ट्रॅक्टर ट्रॉली आणि शेती अवजारे बनवण्याचा व्यवसाय सांभाळून शेतीकडे लक्ष दिले.

शेतीमध्ये पिक पद्धतीत बदल करावा हे ठरवल्यानंतर त्यांनी आले पिकाची लागवड करण्याचा निर्णय घेतला व त्यांच्या असलेल्या आठ एकर शेती मधून दीड एकर क्षेत्रावर आले पिकाची बेड बनवून लागवड केली. लागवड करण्याआधी त्यांनी तीन महिने पूर्व मशागत करताना या दीड एकरमध्ये कोंबडी खत असे शेणखत,

निंबोळी खत व राख इत्यादी खतांच्या 15 ट्रॉली टाकल्या व पिकांवर तीन बेसल डोस व वेळोवेळी पिकाची गरज ओळखून फवारणीचे नियोजन केले. तसेच आले पिकाला पाणी व्यवस्थापन करण्यासाठी त्यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करून कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले. पहिल्याच वर्षी त्यांनी हे सर्व आले पिकाची बियाणे म्हणून विक्री केली.

 मिळवले एकूण 17 लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न

रमेश अडसूळ यांनी व्यवस्थितपणे आले पिकाची काळजी घेतली व एकरी सतरा लाख रुपये इतके आर्थिक उत्पन्न मिळवण्यामध्ये ते यशस्वी झाले. दीड एकर मध्ये त्यांना एकूण खर्च 9 लाख रुपये आला आणि हा खर्च वजा करता त्यांना एकरी 11 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला.

विशेष म्हणजे त्यांनी आल्याची लागवड दोन टप्प्यात केलेली होती व आता दीड एकरातील आले काढणी झाली असून अजून सव्वादोन एकरामध्ये त्यांनी आल्याची लागवड केलेली आहे.

योग्य व्यवस्थापन ठेवून रमेश अण्णा यांनी आल्याचे भरघोस उत्पादन मिळवले. परंतु यावर्षी बाजारभाव थोडा कमी मिळाल्यामुळे उत्पन्नात काहीशी घट झाल्याचे त्यांनी म्हटले. त्यांनी पिकवलेल्या आल्याला घाऊक बाजारात सरासरी 42 हजार रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला.

 उर्वरित शेतामध्ये लागवड केली आहे सफरचंद तसेच केळी पपई आणि आंब्याची

इतकेच नाहीतर रमेश अडसूळ हे एक प्रयोगशील शेतकरी म्हणून परिसरात ओळखले जातात व त्यांनी आलेच नाही तर तर उर्वरित क्षेत्रामध्ये केळी, पपई तसेच सफरचंद व आंबा आणि ऊस पिकाची लागवड केलेली आहे

व या माध्यमातून देखील त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. यावरून आपल्याला दिसून येते की शेतकऱ्यांनी एकाच पिकाची लागवड न करता जर पिकांच्या लागवडीमध्ये विविधता जपली तर नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe