Rice Farming: देशात सर्वत्र खरीप हंगाम (Kharif Season) जोमात सुरु आहे. राज्यातील शेतकरी बांधवानी (Farmer) खरीप हंगामातील पेरणीची कामे जवळपास पूर्ण केली आहेत. खरीप हंगामात राज्यातील शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात धानाची म्हणजेच भाताची लागवड (Paddy Farming) करत असतात.
आता आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांनी धानाची रोवणी देखील उरकून घेतली आहे. धान हे राज्यातील अनेक शेतकरी बांधवांचे मुख्य पिकं आहे. धान उत्पादक शेतकरी बांधव अनेक दशकांपासून मोठ्या प्रमाणात धानाची रोवणी करत आहेत.

राज्यातील कोकणात (Konkan) तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाची रोवणी केली जाते. यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण देखील धान या पिकावर अवलंबून आहे. मित्रांनो कृषी तज्ञांच्या मते, धान उत्पादक शेतकरी बांधवांनी जर धानाच्या सुधारित जातींची (Rice Variety) लागवड केली तर निश्चितच त्यांना लाखो रुपयांची कमाई होणारं आहे.
धानाच्या प्रगत जातींची लागवड केल्यास धान उत्पादक शेतकरी बांधवांना चांगली कमाई होते शिवाय धान पिकावर रोगराई देखील कमी प्रमाणात येते यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी बचत होते. आज आपण भारतात लागवड केल्या जाणाऱ्या एका धानाच्या सुधारित जातीची माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो धानाची ही जात बिहार मधील कृषी वैज्ञानिकांनी विकसित केली आहे. बिहारच्या कृषी वैज्ञानिकांनी धानाच्या या सुधारित जातीला साबौर हीरा धान असं नाव दिलं आहे. मित्रांनो कृषी तज्ञांच्या मते, धानाची ही जात शेतकरी बांधवांना अतिरिक्त उत्पन्न मिळवून देते शिवाय या जातीच्या भातात चांगले औषधी गुणधर्म आढळतं असल्याने याचे सेवन देखील मानवी आरोग्यासाठी विशेष लाभदायी ठरत आहेत.
साबौर हीरा धान पिकाची वैशिष्ट्ये
मीडिया रिपोर्ट्सनुसार, साबौर हीरा धान ही भाताची जात बिहारमधील कृषी शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे. या जातीला विकसित करण्यासाठी कृषी शास्त्रज्ञांना सात वर्ष मेहनत घ्यावी लागली आहे. या धानाच्या जातीची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन या जातीची बिहार तसेच देशातील इतर पाच राज्यात मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. केंद्र सरकारने देखील या संबंधित राज्यात त्याची लागवड करण्यास मान्यता दिली आहे.
कृषी तज्ञांच्या मते भाताची ही जात, कमी पाण्यात उत्पादन देण्यास तयार होते. यामुळे कृषी वैज्ञानिक देखील या जातीच्या भाताची लागवड करण्याचा सल्ला देतात. शिवाय या जातीचा भात आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने याची मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
या जातीच्या भात पिकामध्ये रोगप्रतिकारक शक्ती अधिक असते. यामुळे कीटक व रोगांचा प्रादुर्भाव कमी होत असतो. कृषी तज्ञांच्या मते कमी पाण्यात आणि सेंद्रिय शेती करून या जातीपासून अधिक उत्पादन घेता येते. निश्चितच शेतकरी बांधवांसाठी ही जात फायद्याची ठरत आहे.
या जातीमध्ये अप्रतिम रोग प्रतिरोधक क्षमता आहे, जी सामान्य धानापेक्षा दीडपट जास्त उत्पादन मिळवून देत असल्याचा दावा केला जातो.
असे सांगितले जाते की, कमी पाण्याच्या भागात, धानाची ही जात केवळ 15 दिवस पाण्यात राहूनही 70 ते 80 क्विंटलपर्यंत उत्पादन देते.
या जातींचे भात पीक 110 ते 150 सेमी वाढले की काढणीसाठी तयार होत असते. भाताची ही जात जोरदार वादळ आणि वारा सहन करू शकते. यामुळे या जातीची लागवड करण्याची शिफारस केली जाते.