अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये फुलले केशर! युट्युबची मदत घेऊन चिंचवार शिक्षक दांपत्याने साध्य केली किमया

सध्याचे युग हे इंटरनेटचे युग आहे व या इंटरनेटच्या मदतीने आपण अगदी एका क्लिकवर घरी बसून अनेक प्रकारची जागतिक पातळीवरची माहिती मिळवू शकतो व कोणत्याही क्षेत्रात होणारे नवनवीन प्रयोग व त्याबद्दलचे तंत्रज्ञान इत्यादी बद्दलची माहिती मिळवू शकतो.

Ajay Patil
Published:
saffron farming

Saffron Cultivation:- सध्याचे युग हे इंटरनेटचे युग आहे व या इंटरनेटच्या मदतीने आपण अगदी एका क्लिकवर घरी बसून अनेक प्रकारची जागतिक पातळीवरची माहिती मिळवू शकतो व कोणत्याही क्षेत्रात होणारे नवनवीन प्रयोग व त्याबद्दलचे तंत्रज्ञान इत्यादी बद्दलची माहिती मिळवू शकतो.

अगदी याच पद्धतीने आपल्याला माहित आहे की आपण youtube च्या साह्याने अनेक विषयांवर आधारित असलेले माहितीपूर्ण व्हिडिओ बघू शकतो व त्याद्वारे कित्येक महत्त्वाच्या असलेल्या क्षेत्राविषयीची माहिती आपल्याला मिळू शकते.

अगदी याच पद्धतीने आपल्याला माहित आहे की, युट्युबवर अनेक पद्धतीने शेतीवर आधारित देखील व्हिडिओ असतात व या माध्यमातून आपल्याला अनेक वेगवेगळ्या पिकांची माहिती तसेच त्यांच्या लागवडीच्या पद्धती व शेतीमध्ये आलेले नवनवीन तंत्रज्ञान घरबसल्या पाहायला व ऐकायला मिळते.

अगदी याच पद्धतीने youtube आणि गुगलची मदत घेऊन अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात राहणारे रामदास आणि नीलम चिंचवार या शिक्षक असलेल्या दांपत्याने असेच कौतुकास्पद कामगिरी केली आहे व त्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून केशर लागवडीची माहिती मिळवून केशर शेती यशस्वी केली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील चिंचवार दांपत्याने केशर लागवड केली यशस्वी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अहिल्या नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील रामदास चिंचवार आणि त्यांच्या पत्नी नीलम चिंचवार हे दोघेही शिक्षक आहेत. परंतु नोकरी करत असताना त्यांना शेती करण्याची देखील तीव्र अशी इच्छा मनामध्ये होती.

परंतु नेमके शेती करावी तर कोणत्या पिकांची लागवड करावी व कशा पद्धतीची शेती करावी याबाबत ते संभ्रमावस्थेत होते व अनेक माध्यमातून ते शेतीच्या वेगवेगळ्या पद्धती व पिकांची माहिती मिळवत होते. अशातच त्यांना गुगल आणि youtube च्या माध्यमातून केशर शेतीची माहिती मिळवली व त्यांनी केशर लागवडीचा निर्णय घेतला.

त्यांनी युट्युबवर केशर लागवडीबाबत एक व्हिडिओ पाहिला व त्यानंतर त्यांनी केशर लागवडीवर अभ्यास केला. यावरच न थांबता त्यांनी थेट काश्मीरमधील शेतकऱ्यांशी चर्चा केली व ज्या ठिकाणी केशरची सर्वाधिक लागवड केली जाते अशा काश्मीरमधील शेतकऱ्यांकडून केशर लागवडीच्या टिप्स घेतल्या व घरात कृत्रिमरित्या त्या पद्धतीचे वातावरण व जागा तयार करून केशरची लागवड केली.

केशर पिकासाठी आवश्यक असलेले तापमान त्यांनी त्या खोलीमध्ये मेंटेन केले. केशर लागवडीच्या दृष्टिकोनातून बघितले तर प्रामुख्याने ती तीन टप्प्यात केली जाते. यातील पहिल्या टप्प्यांमध्ये केशर बिया स्वच्छ केल्या जातात व त्या एका ट्रेमध्ये ठेवल्या जातात. जेव्हा त्या बियांपासून रोप तयार होते तेव्हा ते जमिनीत लावले जाते व त्या रोपातून फुले येतात.

याच फुलांच्या माध्यमातून केशर काढले जाते. केशरची काढणी वर्षातून एकदा होते व त्यानंतर एका बियाण्यापासून चार बिया तयार होत असल्यामुळे दरवर्षी नवीन केशरचे बियाणे खरेदी करण्याची गरज भासत नाही.

चिंचवार दांपत्याने एका वर्षांपूर्वी तीन किलो बियाणे मागवले होते व त्यांचे या तीन किलो बियाण्याचे या वर्षी दुप्पट बियाणे झाले आहे. तीन किलो बियाण्यातून त्यांना अडीचशे ग्रॅम केशरचे उत्पादन मिळाले आहे. जर आपण एक ग्रॅम केशरची किंमत बघितली तर ती भारतामध्ये 700 ते 800 रुपये प्रति ग्राम इतकी आहे.

एवढी मागणी असण्याचे प्रमुख कारण म्हणजे भारतात फक्त काश्मीर येथेच केशरची लागवड केली जाते व मागणीच्या मानाने मात्र केशरचा पुरवठा अतिशय कमी आहे. हीच संधी ओळखून चिंचवार दंपत्याने सुरू केलेला त्यांचा हा केशर लागवडीचा प्रयोग नक्कीच त्यांच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे व इतर शेतकऱ्यांसाठी देखील प्रेरणादायी असाच आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe