Solar Light Trap : पिकांवरील किडींची आता नाही काळजी! कीड नाही येणार पिकाजवळ फक्त…

Published on -

   Solar Light Trap: पिकांच्या भरघोस उत्पादनाकरिता किडींचे व्यवस्थापन खूप महत्त्वाचे असते. कीड व्यवस्थापनाकरिता शेतकरी विविध प्रकारच्या रासायनिक कीटकनाशकांच्या फवारण्या करतात. परंतु या माध्यमातून  किडींचे योग्य व्यवस्थापन किंवा नियंत्रण होईलच याची शक्यता खूप कमी असते. तसेच कीटकनाशकांचा खर्च वाढतो. त्यामुळे किडनियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीला प्राधान्य देणे खूप गरजेचे आहे.

एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी पीक लागवडीपूर्वी जमिनीची पूर्व मशागती पासून अनेक बाबींचा समावेश होतो. यामध्ये विविध प्रकारच्या कीटक सापळ्यांचा वापर शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचा ठरतो. या सापळ्यांमध्ये किडी पकडल्या जातात व त्यामुळे त्यांचं जे काही जीवन चक्र असतं ते खंडित होते व पुढील किडनियंत्रणावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येणे शक्य होते. त्यामुळे किडनियंत्रणाकरिता विविध प्रकारच्या सापळ्यांचा वापर खूप फायदेशीर ठरतो. यामध्ये सौर प्रकाश सापळ्यांचा वापर नक्कीच फायद्याचा ठरताना दिसत आहे.

 सौर प्रकाश सापळे म्हणजे काय?

जर आपण सौर प्रकाश सापळे यांची रचना पाहिली तर यामध्ये ट्रायपॉड असतो व या ट्रायपॉड वर एक भांडे, एक एलईडी बल्ब आणि सौर पॅनल बसवलेले असते. सौर पॅनलच्या पद्धतीने सौर ऊर्जेचा वापर केला जातो व या माध्यमातून किडनियंत्रणाचे महत्त्वपूर्ण कार्य पार पडते. या माध्यमातून एलईडी बल्ब संध्याकाळी साडेसहा ते साडेनऊ वाजेपर्यंत प्रकाश देतात व त्यांचा जो काही निळा प्रकाश असतो तो कीटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करण्याचे काम करतो.

या सौर प्रकाश सापळ्यांमध्ये बॅटरी इन्स्टॉल केलेली असते व सौर पॅनलच्या माध्यमातून ही बॅटरी शोषलेल्या सूर्यप्रकाशाद्वारे चार्ज होते आणि त्याला जोडलेल्या इलेक्ट्रॉनिक सर्किट च्या माध्यमातून सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करते आणि ही ऊर्जा बॅटरी मध्ये साठवली जाते. हीच साठवलेली ऊर्जा सापळ्यात जो काही एलईडी बल्ब बसवलेला असतो त्या माध्यमातून वापरले जाते.

सौर प्रकाश सापळ्यांमध्ये तीनशे ते चारशे वीस नॅनो मीटरचे स्पेक्ट्रम असतात व यासह युव्ही ए प्रकाश देणारे लाईट यांचा वापर यामध्ये केला जातो. याकडे माशा मोठ्या प्रमाणावर आकर्षित होतात आणि या ठिकाणी गोंदबोर्डला ते चिकटतात. कीटक सापळा हा पीक संरक्षणाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचे साधन असून विजेची वारंवार समस्या उद्भवणाऱ्या भागांमध्ये हा सापळा किडनियंत्रणासाठी प्रभावी ठरत आहे.

 सौर प्रकाश सापळ्याचे वैशिष्ट्य आणि फायदे

या सापळ्याच्या माध्यमातून कीटक प्रकाशाकडे आकर्षित होतात व बल्ब सभोवतालच्या तारांमधून वाहणाऱ्या विद्युत शॉकने ते मरतात. बऱ्याचदा काही कीटक खाली ठेवलेल्या पाण्याच्या भांड्यामध्ये न पडता उडून जाण्याची शक्यता असते. परंतु असे उडून जाणारे कीटक त्या विजेच्या शॉकने मरतात.

हा प्रकाश सापळा लीप फोल्डर, स्टेम बोरर पतंग तसेच फ्रुट बोरर मॉथ,हॉफर्स तसेच फ्रुट विव्हील आणि बीटल या किडींचे पतंग यामध्ये मोठ्या प्रमाणावर अडकतात. संपूर्ण पिकामध्ये हा सापळा लावता येतो व वापरण्यास देखील सोपा आहे. सौर प्रकाश सापळा  पूर्णपणे स्वयंचलित असून याला कुठल्याही प्रकारच्या मनुष्यबळाची गरज नाही. तसेच रासायनिक कीड व्यवस्थापन खर्च कमी करण्यास मदत करते व पर्यावरण अनुकूल असा हा सापळा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe