Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारभावात मोठी पडझड! आज ‘या’ बाजारात मिळाला 3 हजाराचा भाव, वाचा आजचे बाजारभाव

Published on -

Soybean Bajar Bhav : राज्यात सोयाबीन पिकाची (Soybean Crop) मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र राज्यात विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधव (Farmer) सोयाबीन या नगदी पिकावर (Cash Crop) अवलंबून आहेत.

मात्र गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनला फारच कमी बाजारभाव (Soybean Rate) मिळत आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मते सध्या मिळत असलेल्या बाजार भावात (Soybean Market Price) सोयाबीन पिकासाठी झालेला खर्च काढणे देखील मुश्कील आहे.

आज तर सोयाबीनच्या बाजारभावात कमालीची घसरण पाहायला मिळाली. देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला तीन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 3800 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव शेती करायची कशी असा सवाल उपस्थित करत आहेत. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की बाजारात नवीन सोयाबीन अजूनही कमी प्रमाणात दाखल होत आहे.

मात्र येत्या काही दिवसात नवीन सोयाबीनची देखील आवक वाढणार आहे. अशा परिस्थितीत नवीन सोयाबीन बाजारात मोठ्या प्रमाणात आल्यानंतर सोयाबीनला काय बाजार भाव मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान आपण आज राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळालेल्या सोयाबीन बाजार भावाविषयी चर्चा करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- या बाजार समितीमध्ये आज चार हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 210 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 540 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनची 64 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 750 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4500 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

राहता कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज राहता एपीएमसीमध्ये 51 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार 850 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 850 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4 हजार 600 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 459 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार 935 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 925 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 720 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती :- अमरावती एपीएमसीमध्ये आज 1590 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 725 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 362 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज सोयाबीनची 2462 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 555 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4585 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 792 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- एपीएमसीमध्ये आज 6902 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 181 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव पाच हजार रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- या बाजार समितीमध्ये आज 676 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार 905 रुपये प्रति क्विंटल एवढा निमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 940 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 495 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 90 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 4800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 3800 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!