Soybean Cultivation: सोयाबीन पिकातून लाखोंची कमाई होणारं! फक्त ‘हे’ एक काम करावे लागणार, वाचा सविस्तर

Ajay Patil
Published:
soybean cultivation

Soybean Cultivation: सोयाबीन (Soybean Crop) हे खरीप हंगामातील (Kharif Season) एक प्रमुख पीक आहे. सध्या हे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. राज्यातील अनेक भागात सोयाबीन दोन महिन्याचे झाले आहे. म्हणजे सोयाबीनचे निम्मं आयुष्य आता झाले असून पीक फुलोरा अवस्थेत आहे.

यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी (Soybean Grower Farmer) बांधवांना पीक व्यवस्थापन (Soybean Crop Management) करावे लागणार आहे. प्रामुख्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तण-नियंत्रण (Weed Control) करावं लागणार आहे.

मित्रांनो तणामुळे (Weed) सोयाबीन पिकावर विपरीत परिणाम होतो. जाणकार लोकांच्या मते पिकात वाढणारे तण पिकांचे पोषण घेऊन घेते तसेच यामुळे किटकांचा उपदर्व वाढतो परिणामी पीक उत्पादनात घट होते. अशा परिस्थितीत सोयाबीन पिकातून चांगले उत्पादन मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांनी सोयाबीन पीक व्यवस्थापन करतांना तण नियंत्रण मिळवण अतिशय महत्वाचं राहणार आहे.

मित्रांनो जाणकार लोक सांगतात की, सुरवातीला सोयाबीनच्या शेतात पाणी पाट, बांध, कंपोस्ट खड्डे या जवळ तणे उगवले असल्यास त्यांचा नायनाट करावा. या ठिकाणी तण उगवल्यास सोयाबीन फुलोऱ्यावर येण्यापूर्वी उपटून टाकावीत. असे केल्यास सोयाबीन पिकात तणांचा प्रसार रोखला जातो.

या ठिकाणी असलेल्या तण नियंत्रणसाठी यांत्रिक शक्तीचा वापर केला पाहिजे. म्हणजे खुरपणी, कोळपणी, खांदणी, तण उपटणे, छाटणे किंवा जाळणे इ. पद्धतीने तण नियंत्रण केले पाहिजे. या भौतिक पद्धतीने तण नियंत्रण केल्यास शेतकऱ्यांना फायदा होणारं आहे. तसेच यामुळे रासायनिक खतामुळे होणारे दुष्परिणाम देखील होणारं नाहीत.

एवढं करून तणाचा प्रसार फक्त कमी करता येणार आहे म्हणून तण नियंत्रण पूर्णपणे करण्यासाठी शेतकरी बांधवांना रासायनिक तणनाशकाचा वापर करावा लागणार आहे. तण नियंत्रण करताना शिफारस केलेल्या तणनाशकाचा वापर करावा लागणार आहे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया तण नियंत्रण करण्याची रासायनिक पद्धत्त.

खरीपातील सोयाबीन पिकातील तण नियंत्रण करण्याची पद्धत 

सोयाबीन पिकात आढळणारे प्रमुख तणे नेमकी कोणती बर:- सोयाबीन पिकात लव्हाळा, केना, क्रब ग्रास, राळा, चिमणचारा, वाघनखी इ. तण आढळतात. या तणामुळे सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान होते.

सोयाबीन पिकातील तण नियंत्रण:- तणे 2 ते 3 पानांवर असताना बेंटॅझोन या औषधची फवारणी करावी. यासाठी बेंटॅझोन 480 ग्रॅम / लि. या प्रमाणात घेऊन फवारणी करावी. 2000 मि.लि. प्रति 500 लिटर पान्यात हे औषध मिसळून फवारणी करावी. किंवा 100 मि.लि. प्रति एकर हे प्रमाण लक्षात ठेऊन फवारणी करावी.

सोयाबीन पेरणीनंतर 3 ते 15 दिवसांनी क्लोरीम्यूरॉन इथाईल (25% डब्ल्यू.पी.) 36 ग्रॅम प्रति 300 लिटर पाणी + सर्फेक्टंट किंवा 14 ग्रॅम क्लोरीम्यूरॉन इथाईल (25% डब्ल्यू.पी.) प्रति एकर + सर्फेक्टंट  या प्रमाणे फवारणी करावी.

पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी फिनोक्साप्रॉप पी इथाईल (9.3% ई.सी.) 111 मि.लि. प्रति 250 ते 300 लिटर पाणी किंवा 444 मि.लि. फिनोक्साप्रॉप पी इथाईल (9.3% ई.सी.) प्रति एकर या प्रमाणात फवारणी करावी लागणार आहे.

सोयाबीन पिकात तणे 2 ते 3 पानांच्या अवस्थेत असताना इमॅजीथाइपर (10% एस.एल.) 1 लिटर प्रति 500 ते 600 लिटर पाणी किंवा 400 मि.लि. इमॅजीथाइपर (10% एस.एल.) प्रति एकर हे प्रमाण घेऊन फवारणी करावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe