Soybean Farming: सोयाबीन पिकातून लाखोंचे उत्पन्न मिळवायचे ना..! मग गोगलगाय किटकावर असं नियंत्रण मिळवा, लाखोंची कमाई फिक्स होणारं  

Published on -

Soybean Farming: भारतात गेल्या अनेक वर्षांपासून खरीप हंगामात (Kharif Season) मोठ्या प्रमाणात सोयाबीनची शेती (Soybean Cultivation) केली जाते. राज्यातही सोयाबीनचे क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे.

सोयाबीन (Soybean Crop) खरं पाहता खरीप हंगामातील एक मुख्य पीक आणि नगदी पीक (Cash Crop) म्हणून ओळखले जाते. मात्र असे असले तरीही सोयाबीनची आता उन्हाळी हंगामात देखील शेती केली जाऊ लागली आहे.

राज्यात गेल्या उन्हाळी हंगामात शेतकरी बांधवांनी (Farmer) मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे यशस्वी उत्पादन घेऊन दाखवले आहे. शिवाय गत खरीप हंगामात सोयाबीनला चांगला दर (Soybean Rate) मिळाला असल्याने या खरीप हंगामात सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे.

दरम्यान आता सोयाबीन पिकावर शंखी गोगलगायीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव बघायला मिळत आहे. सोयाबीन पिकावर गोगलगायीचा (snail) प्रादुर्भाव असल्याने उत्पादनात घट होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अशा परिस्थितीत शंखी गोगलगाय या किडीवर वेळीच नियंत्रण मिळवणे शेतकऱ्यांसाठी चॅलेंजिंग काम राहणार आहे. यामुळे आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी गोगलगाय किडीवर कशाप्रकारे नियंत्रण मिळवायचे याविषयी महत्त्वपूर्ण माहिती घेऊन हजर झालो आहोत.

शास्त्रज्ञांच्या मते, शेतकरी बांधवांनी शंखी गोगलगाय तसेच पैसा या कीटकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांनी सुतळी पोते गुळाच्या पाण्यात बुडवून सोयाबीनच्या वावरात ठिकाणी पसरून द्यावे असा सल्ला दिला आहे. शेतकरी बांधवांकडे सुतळी पोते उपलब्ध नसल्याने शेतकरी बांधव गवताचे पेढे गुळाच्या पाण्यात बुडवून देखील ठिकठिकाणी वावरात पसरवू शकतात.

यामुळे गोगलगाय तसेच शेम्बडी या किटकांवर नियंत्रण मिळवता येणार असल्याचा दावा शास्त्रज्ञ करत आहेत. कृषी शास्त्रज्ञांच्या मते असे केल्याने अवघ्या एका दिवसात गोगलगाय कीटकांवर नियंत्रण मिळवता येणे शक्य होणार आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की गेल्या चार-पाच वर्षांपासून शंखी गोगलगाय, पैसा, शेम्बडी या कीटकांमुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. खरं पाहता या किडी विशेषता गोगलगाय सोयाबीन पीक रोपावस्थेत असताना त्याच्यावर हल्ला करते.

रोपवस्थेत असलेल्या सोयाबीन पिकाचे या किडी पाने खुडून टाकतात यामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान होते. कृषी शास्त्रज्ञांच्या मते, गोगलगाय किडीला पाऊस, ढगाळ वातावरण, जास्त आर्द्रता व कमी तापमान अर्थात (20 अंश ते 32 अंश से.) पोषक आहे.

शेतकरी बांधवांनी जर या कीटकांवर वेळीच नियंत्रण मिळवले नाही तर सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान होण्याची भीती असते. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी या कीटकांवर सोप्या पद्धतीने नियंत्रण मिळवावे. त्यामुळे शेतकरी बांधवांच्या उत्पादनात वाढ होणार आहे आणि सहाजिकच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात देखील भरीव वाढ होणारं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe