Soybean Variety: सोयाबीनच्या ‘या’ वाणांची लागवड करा आणि एकरी 20 क्विंटल उत्पादन मिळवा! घरी येईल पैशांची गंगा

Ajay Patil
Published:
soybean variety

 

Soybean Variety:- सध्या खरीप हंगामाची तयारी जोरात सुरू असून तळ कोकणामध्ये मान्सूनचे आगमन देखील झालेले आहे व आता काही दिवसांमध्ये खरीप हंगामातील पेरण्यांना देखील वेग येईल. आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची लागवड केली जाते.

त्यामुळे आता या पेरण्यांच्या  कालावधीमध्ये शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी धावपळ होताना आपल्याला दिसून येते. कारण प्रत्येक शेतकऱ्याची अपेक्षा असते की पेरणी करिता त्यांना दर्जेदार आणि उत्पादनक्षम असे बियाणे मिळावे. या अनुषंगाने शेतकरी प्रयत्न करत असतो.

कारण दर्जेदार बियाण्यावरच भरघोस उत्पादन अवलंबून असते व त्या दृष्टिकोनातून बियाण्यांची निवड खूप महत्त्वाची ठरते. त्यामुळे या लेखात आपण सोयाबीनच्या अशा काही व्हरायटींची माहिती घेणार आहोत जे एकरी वीस क्विंटल पर्यंत उत्पादन देऊ शकतात.

 सोयाबीनच्या या व्हरायटी देतील एकरी 20 क्विंटल उत्पादन

1- फुले संगम सोयाबीनची फुले संगम व्हरायटी जवळपास महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये लागवड केली जाते. खास करून मराठवाडा आणि विदर्भामध्ये फुले संगम व्हरायटीची लागवड जास्त प्रमाणात पाहायला मिळते.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सोयाबीनची ही व्हरायटी सर्वात जास्त विक्री होते. बरेच शेतकरी या व्हरायटी पासून एकरी 15 ते 20 क्विंटल पर्यंत उतारा मिळवतात.

2- फुले दूर्वा फुले संगम प्रमाणेच फुले दुर्वाची देखील महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. राज्यातील जे काही प्रमुख सोयाबीन उत्पादक जिल्हे आहेत त्यामध्ये उत्पादित होणारा हा एक महत्त्वाचा वाण आहे.

विशेष म्हणजे महाराष्ट्रातील हवामान फुले दुर्वा जातीसाठी पूरक असून त्यापासून भरघोस उत्पादन मिळते. बरेच शेतकरी फुले दुर्वा वरायटीची लागवड करून एकरी 15 ते 17 क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळवत आहेत.

3- फुले कल्याणी 228- सोयाबीनच्या भरघोस आणि जास्तीच्या उत्पादनाकरिता शेतकऱ्यांनी फुले कल्याणी 228 या जातींची लागवड केली तरी मोठा फायदा मिळू शकतो. सोयाबीनचे फुले कल्याणी 228 ही जात जास्त उत्पादनासाठी प्रामुख्याने ओळखले जाते.

या व्हरायटीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही विविध प्रकारचे रोग आणि कीटकांना प्रतिकारक असल्यामुळे  पिकांवरील कीटकनाशकांचा खर्च कमी होतो व पैशात देखील बचत होते. बरेच शेतकरी फुले कल्याणी 228 या व्हरायटीच्या लागवडीतून एकरी 15 ते 20 क्विंटल पर्यंत उत्पन्न घेताना आपल्याला दिसून आले आहेत.

त्यामुळे या खरीप हंगामामध्ये या तीन व्हरायटींपैकी एकाची निवड शेतकरी बंधू करू शकतात व याकरिता कृषी तज्ञांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल.