Flower Farming: 1000 रुपये दराने विकले जाणारे ब्रह्मकमळ फुल कायम असतं चर्चेत; जाणुन घ्या कुठं केली जाते याची शेती

Ajay Patil
Published:
Orchid Cactus Farming

Krushi News: भारतात मोठ्या प्रमाणात फुल शेती (Floriculture) केली जाते. फुलशेतीच्या माध्यमातून शेतकरी (Farmer) चांगले उत्पन्न देखील कमवत असतात. मित्रांनो देशात आढळणाऱ्या फुलापैकी ब्रह्मकमळ (Brahma Kamal) हे एक देखील प्रमुख फुल आहे. हे फुल खुपच दुर्मिळ असून ही फुलांची अविस्मरणीय प्रजाती आहे.

हिंदू सनातन धर्मात असे म्हटले जाते की, भगवान आदिपुरुष ब्रह्मा आणि विद्येची देवी सरस्वती या ब्रह्मकमळ फुलावर बैसिले आहेत. यामुळे हिंदु सनातन धर्मात ब्रह्मकमळ फुलाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हे पांढरे कमळ अत्यंत दुर्मिळ असल्याने हे कायम चर्चेत बघायला मिळते. खरं पाहता ब्रह्मकमळ भारतातील फक्त काही प्रदेशातील दुर्गम टेकड्यांवर आढळते.

मात्र, आता काही ठिकाणी या दुर्मिळ आणि अविस्मरणीय फुलाची व्यावसायिक शेती (Orchid Cactus Farming) आता शेतकरी बांधवांनी सुरू केली आहे. ब्रह्मकमळ खुपच कमी प्रमाणात उत्पादित केले जाते यामुळे मागणीनुसार पुरवठा ब्रह्मकमळाचा होत नाही यामुळे या फुलाला कायम चांगली किंमत मिळतं असते.

याचे एक फूल 500 ते 1000 रुपयांना मिळते आणि शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. हे फूल सध्या बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यात चर्चेचा विषय आहे. येथे एका गावात हे फूल दाखवण्यात आले आहे, ज्याची संपूर्ण परिसरात चर्चा होत आहे.

बिहारमधील समस्तीपूर येथील दलसिंग सराय जवळील चांदचौर करिहारा गावात पिंपळाच्या झाडावर हे फूल दिसले आहे. आजूबाजूच्या गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पिंपळाच्या झाडावर फूलच उमलत नाही, तर मग हे काय आहे? अनेक दिवसांपासून या दुर्मिळ प्रजातीची फुले पाहून लोक आश्चर्यचकित होत आहेत.

कारण या ऋतूत आणि पिंपळाच्या झाडावर या फुलांचा बहर स्थानिक लोकांसाठी एखाद्या अलौकिक गोष्टीपेक्षा कमी नाही. पौराणिक मान्यतेनुसार, या फुलाच्या बहरल्याने दुष्ट आत्म्यांचा नाश होतो. हे फूल भगवान शंकराला अर्पण केल्याने भक्तांना वरदान मिळते अशी देखील आख्यायिका आहे.

विज्ञान काय म्हणते?

देशातील सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ एसके सिंह सांगतात की, बिहारमध्ये दिसणार हे फुल ब्रह्म कमल आहे. ही एक दुर्मिळ आणि पौराणिक वनस्पती आहे. सूर्यास्तानंतर संध्याकाळी 7 वाजल्यापासून ब्रह्मकमळाची फुले उमलण्यास सुरुवात होते आणि पूर्ण बहर येण्यासाठी सुमारे दोन तास लागतात. त्याचा व्यास सुमारे 8 इंच आहे आणि रात्रभर उघडा राहतो. सृष्टीची देवता ब्रह्मा यांच्या नावावरून हे नाव देण्यात आले आहे. ब्रह्मकमळ वर्षभरात फक्त एक रात्र फुलते.

काय विशेष आहे?

रात्री उशिरा फुलणाऱ्या कमळासारख्या सुंदर फुलांमुळे याला सामान्यतः रात्री-फुलणारी सेरेस आणि रात्रीची राणी म्हणून ओळखले जाते. भारतात याला ब्रह्म कमल म्हणतात आणि अतिशय पवित्र वनस्पती मानली जाते. याला ऑर्किड कॅक्टस असेही म्हणतात, कारण या फुलाचे सौंदर्य ऑर्किडसारखे असते आणि वनस्पती कॅक्टससारखी असते.

ब्रह्मकमळाची आता शेती केली जाऊ लागली आहे

हिमालयात आढळणारी ब्रह्मा कमल वनस्पती बहुतेक वेळा घरांमध्ये खिडकीच्या चौकटीवर उगवणाऱ्या वनस्पतीमध्ये मिसळली जाते. हे उत्तराखंड राज्याचे फूल असल्याचे सांगितले जातं आहे. ही फुले हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीरसह काही राज्यांमध्येच आढळतात. उत्तराखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये या फुलाची लागवड सुरू झाली असून, त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. एका फुलाची किंमत 500 ते 1000 रुपयांपर्यंत आहे.

हे ब्रह्मदेवाचे फूल म्हणूनही ओळखले जाते. जो पाहतो तो खूप भाग्यवान मानला जातो. ओडिशामध्ये लोक ते भगवान जगरनाथला अर्पण करतात. असे मानले जाते की, ज्या गुलाबी फुलावर ब्रह्मदेव बसलेले दिसतात, ते फूल ब्रह्मा कमल आहे. असे मानले जाते की यामुळे नशीब आणि समृद्धी येते आणि ज्या घरात फुले येतात ते घर खूप शुभ आणि भाग्यवान असते.

अलौकिक शक्तींनी परिपूर्ण

ब्रह्मकमळ ही एक औषधी वनस्पती आहे. तिबेटी औषधांमध्ये ही एक औषधी वनस्पती मानली जाते. हा ब्रह्मकमळ हा निवडुंगाचा एक प्रकार आहे. या फुलासाठी जास्त पाणी लागत नाही. दोन ते तीन दिवसांतून फक्त एकदा पाणी द्यावे. जास्त पाणी दिल्याने ही झाडे सुकतात किंवा पाणी साचले तरी झाड मरू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe