पदवी घेऊन नोकरीसाठी भटकंती थांबवली आणि सुरू केली शेती! ‘हा’ तरुण शेतकरी पपई लागवडीतून वर्षाला घेतो 15 लाखाचे उत्पन्न

Ajay Patil
Published:
papaya crop

दरवर्षी पदवी घेऊन विद्यापीठांच्या बाहेर निघणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यामानाने उपलब्ध नोकऱ्यांचे प्रमाण खूपच कमी असल्यामुळे सुशिक्षित बेरोजगारीच्या समस्येमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढवताना दिसून येत असून दिवसेंदिवस हा प्रश्न उग्र स्वरूप धारण करताना दिसत आहे. त्यामुळे आता सुशिक्षित बेरोजगारीवर मात करण्यासाठी व्यवसाय करण्याशिवाय पर्याय नाही.

त्यामुळे आता अनेक उच्चशिक्षित युवक शेतीकडे वळताना दिसून येत आहेत. परंतु अशाप्रकारे उच्चशिक्षित युवकांनी शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणलेले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या फळ पिकांपासून ते भाजीपाला पिकांचे उत्पादन घेऊन लाखो कमाई करत आहे.

अशाच प्रकारे जर आपण नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात असलेल्या पांगरी गावच्या तरुण शेतकरी लालबा प्रदीप जाधव यांची यशोगाथा पाहिली तर ती काहीशी या मुद्द्याला साजेशी आहे. या तरुणाने शेती देण्याचा निर्णय घेतला व पपई लागवडीतून लाखोत कमाई करण्याची किमया साध्य केली आहे.

 हा तरुण शेतकरी पपई उत्पादनातून घेतो लाखोत कमाई

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात असलेल्या पांगरी या गावचे लालबा प्रदीप जाधव या तरुणाने उच्च शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे न लागता शेती घ्यायचा निर्णय घेतला व पपईची लागवड केली.

या पपईच्या उत्पादनातून लालबा जाधव हे वर्षाकाठी तब्बल 15 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत. ते त्यांच्या घरच्या तीन एकर शेतीमध्ये दरवर्षी पपईची लागवड करतात. यावर्षी देखील पपईला चांगली मागणी मिळाल्यामुळे या शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न मिळाले आहे.

 अशाप्रकारे लालबा जाधव वळले शेतीकडे

लालबा जाधव यांचे शैक्षणिक पार्श्वभूमी पाहिली तर त्यांनी डीएड, बीएड आणि पदवीपर्यंत शिक्षण घेतले व पदवीनंतर मात्र दोन ते तीन वर्ष नोकरीसाठी वणवण भटकले.परंतु नोकरी न मिळाल्यामुळे त्यांनी शेतीत येण्याचा निर्णय घेतला व शेतीत आल्यानंतर काहीतरी वेगळे करावे हा उद्देशाने वेगळे प्रयोग करण्याचा निर्णय घेतला व या प्रयोगाचा भाग म्हणून त्यांनी बारा एकर शेती पैकी तीन एकरमध्ये पपईची लागवड केली.

याकरिता अहमदनगर जिल्ह्यातील परांडा या गावातून त्यांनी 2700 चे पपईचे रोपे दहा रुपये प्रति नग याप्रमाणे विकत घेतले व तीन ते चार फुटावर पपईच्या रोपाची लागवड केली.

त्यातून समाधानकारक पिक निघाले आणि आता ही पपई तोडणी ला आली आहे. सध्या बाजारामध्ये या पपईला 15 ते 16 रुपये किलो प्रमाणे दर मिळत असल्याने लालबा जाधव यांनी सांगितले.

एवढेच नाही तर त्यांनी त्यांच्या बारा एकर शेतीमध्ये पपई सोबत केळी, हळद तसेच सोयाबीनचे पीक देखील घेतात व त्यातून देखील भरघोस उत्पन्न मिळवत आहेत. यावर्षी देखील त्यांनी भरघोस उत्पन्न मिळवले असून सर्व पिके जोमदार आहेत. पपई उत्पादनातून ते आता वर्षासाठी 15 लाखांचे उत्पन्न मिळवत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe