कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ‘या’ तारखेला जमा होणार अनुदान! कृषिमंत्री मुंडेंनी दिली महत्त्वाची माहिती

आता शेतकऱ्यांची असलेली ही प्रतीक्षा लवकरच संपणार असून खरीप हंगाम 2023 मधील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आता लवकरच हे अनुदान जमा करण्यात येणार असल्याचे महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

dhanjay munde

राज्यामध्ये 2023 च्या खरीप हंगामामध्ये म्हणजेच मागच्या वर्षी सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले होते व त्यानुसार अशा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे निश्चित करण्यात आलेले होते. परंतु गेल्या दोन आठवड्यापासून सोयाबीन व कापूस अनुदानासाठी शेतकरी वाट पाहत असून अजून पर्यंत मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा झालेले नाही.

या अगोदर 10 सप्टेंबर पासून अनुदान जमा करण्याच्या सूचना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी यंत्रणांना दिलेल्या होत्या. परंतु अजून पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कुठल्याही प्रकारच्या अनुदान जमा झालेले नसून यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसून येत आहे.

सरकारच्या माध्यमातून नुसत्या तारखांवर तारखा देण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांना सरकार खेळवत असल्याची टीका शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. परंतु आता शेतकऱ्यांची असलेली ही प्रतीक्षा लवकरच संपणार असून खरीप हंगाम 2023 मधील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आता लवकरच हे अनुदान जमा करण्यात येणार असल्याचे महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

 26 सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार अनुदान

याबाबत सविस्तर वृत्त असे की, राज्यामध्ये 2023 या खरीप हंगामामध्ये जे काही सोयाबीन व कापसाचे नुकसान झाले होते अशा नुकसानग्रस्त सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आता 26 सप्टेंबर पासून अनुदान जमा करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे.

या पार्श्वभूमीवर कृषिमंत्र्यांनी गुरुवारी म्हणजेच 19 सप्टेंबर रोजी कृषी विभागातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची यासंदर्भात बैठक घेतली व या बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली.

 काय म्हणाले राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे?

याबाबत बोलताना कृषिमंत्री म्हणाले की, सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 5000 रुपये अनुदान दोन हेक्टर च्या मर्यादित देण्याची कार्यवाही  26 सप्टेंबरच्या अगोदरच करण्याच्या सूचना कृषी विभागाला देण्यात आलेल्या आहेत

व पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नियोजित असा वाशिम जिल्ह्याचा दौरा असून मोदींच्या उपस्थितीत या अनुदानाचे वाटप शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर करण्यात येणार आहे. परंतु पंतप्रधानांची दौऱ्याची तारीख अजून निश्चित झालेली नसल्याने त्यामुळे त्यामध्ये बदल होऊ शकतात देखील माहिती त्यांनी दिली.

 आतापर्यंत कुठवर आली आहे अनुदानाची प्रक्रिया?

राज्यामध्ये जर आपण सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या म्हणजेच खातेदारांची संख्या पाहिली तर ती एकूण 96.17 लाख असून त्यापैकी जवळपास 75.31 लाख शेतकऱ्यांची क्षत्रिय स्तरावर संमती पत्र कृषी विभागाला मिळाली असून त्यातील 64.87 लाख शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर भरण्यात आलेली आहे.

या 64.87 लाख शेतकऱ्यांमधून नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माहिती सोबत जवळपास 46.8 लाख शेतकऱ्यांची माहिती जुळली आहे. त्यासोबतच ई पीक पाहणीच्या माहितीमध्ये 36 लाख शेतकऱ्यांची नावे जुळली असून उर्वरित दहा लाख शेतकऱ्यांची नावे ही त्यांची प्रत्यक्षपणे पडताळणी करून जुळवावी लागणार आहेत असं देखील कृषी विभागाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार असून 26 सप्टेंबर पासून हे अनुदान आता सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe