अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2022 Farmer Success Story :- भारत एक कृषिप्रधान देश असला तरी देखील देशातील अनेक शेतकरी पुत्र आता शेतीकडे (Agriculture) पाठ फिरवू लागले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून नैसर्गिक संकटांमुळे शेती व्यवसाय तोट्यात जात असल्याने शेतकरी पुत्रांनी (Farmer) शेतीकडे पाठ फिरवून नोकरी व उद्योगधंद्याकडे वाटचाल सुरू केली आहे.

मात्र असे असले तरी अनेक प्रगतिशील शेतकरी (Progressive farmers) शेतीत योग्य नियोजन करीत चांगले यश मिळवीत आहेत. याचे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे ते बीड जिल्ह्यातून (Beed District).
सुतार नेट येथील पांडुरंग आणि केशरबाई यांनी खडकाळ जमिनीत केशर आंब्याची बाग (Saffron mango orchard) फुलवली आहे.
पांडुरंग कातखाडे यांनी अर्धा एकर खडकाळ जमिनीत लावलेल्या केशर आंब्याला आता कैऱ्या लागल्या आहेत. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, 2017 मध्ये कातकाडे दांपत्याने सत्तर केशर आंब्याची रोपे लावली होती.
ही रोपे पांडुरंग यांनी राहुरी कृषी विद्यापीठातून आणली होती. 50 रुपये प्रति नग या दराने केशर आंब्याची रोपे त्यांना त्यावेळी मिळाली.
वाहतूक खर्च आणि रोपांचा खर्च असा त्यांना सात हजार रुपये त्यावेळी खर्च आला होता. या केशर आंब्याच्या बागेला पाच वर्षे पूर्ण झाली असून आता कैऱ्या लागल्या आहेत.
कातकाडे दाम्पत्यांनी आतापर्यंत केशर आंब्याच्या बागेला सुमारे सात फवारण्या केल्या आहेत. पांडुरंग यांच्या मते, एका झाडाला सुमारे 100 ते 150 कैर्या लागल्या आहेत.
मागील वर्षी पंधरा ते वीस हजारांचा या दाम्पत्यांना फायदा झाला होता यावर्षी यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे. कातकडे दांपत्ये आपली शेती सांभाळत आंब्याची बाग जोपासत आहेत.
दुसऱ्या पिकांची काळजी घेऊन आंब्याची बाग ते योग्य पद्धतीने जोपासत आहेत. केशर आंब्याची बाग लावलेली जमीन पाण्याचा निचरा होणारी उत्तम जमीन आहे यामुळे केशर आंबे चांगले विकसित झाल्याचे सांगितले जात आहे.
कातकडे दाम्पत्यांना शेतीच्या कामात त्यांची दोन मुले मदत करत असतात. निश्चितच कातकडे यांनी लावलेल्या आंब्याला अजून अपेक्षित असा बहार येत नाही मात्र आगामी काळात यामध्ये वाढ होणार आणि साहजिकच कातकाडे यांच्या उत्पन्नात देखील मोठी वाढ होणार.













