इंजिनीयर मुलांचा नाद नाही करायचा..! या अवलियाने इंजिनिअरचा जॉब सोडला अन सुरू केली शेती, आज शेतीतून करतोय लाखोंची उलाढाल

Ajay Patil
Published:
success story

Success Story : प्रत्येक नवयुवक तरुणांचे स्वप्न असतं की चांगले उच्च शिक्षण घेऊन सरकारी नोकरदार म्हणून किंवा एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीत काम करावे. विशेष म्हणजे अलीकडे नवयुवक शेतकरीपुत्र (Farmer) देखील शेतीऐवजी (Farming) नोकरी तसेच उद्योगधंद्याला प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.

मात्र देशात असेही अनेक नवयुवक आहेत जे चांगल्या पगाराच्या नोकरीवर तुळशीपत्र ठेवत शेतीकडे वळत आहेत. विशेष म्हणजे असे नवयुवक (Successful Farmer) आपल्या ज्ञानाचा यथायोग्य वापर करुन शेती व्यवसायातून लाखो रुपये कमावण्याची (Farmer Income) किमया साधत आहेत.

उत्तर प्रदेश राज्यातील एका अवलिया शेतकऱ्याने देखील असंच काहीसं केल आहे. या अवलिया नवयुवकाने चांगल्या पगाराच्या नोकरीवर तुळशीपत्र ठेवून शेती व्यवसायात आपले करिअर सुरू केले आहे. यूपीमधील शाहजहांपूर येथील रहिवासी असलेल्या अतुल मिश्रा यांनी इंजीनियरिंगची (Engineer) नोकरी सोडून शेतीला निवडले आहे.

संगणक अभियंता असलेल्या अतुलने चांगल्या पगाराच्या नोकरीऐवजी शेती करण्याचा निर्णय घेतला आणि आता तो लाखोंची कमाई करत आहे. पण त्याने असं का केलं त्यामागचं कारण खूप रंजक आहे. यामुळे आज आपण अतुल यांच्या या यशोगाथेवर नजर टाकणार आहोत.

उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यातील मौजे चिलहुआ गावातील रहिवासी असलेल्या अतुल मिश्रा यांनी चेन्नईतून इंजिनीअरिंग पूर्ण केले. इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर अतुलने इंजिनीअरिंगची नोकरी न करता वेगळ्या ट्रॅकवर काम करायला सुरुवात केली आहे. चांगल्या पगारावर कुठेतरी नोकरी करण्याऐवजी त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला.

ड्रॅगन फ्रूटची शेती सुरू केली

अतुलने सांगितले की, इंटरनेटवर खूप शोध घेतल्यानंतर त्याने ड्रॅगन फ्रूटची लागवड सुरू केली. 2018 मध्ये त्यांनी महाराष्ट्रातील सोलापूर (Solapur) येथून काही ड्रॅगन फळांची (Dragon Fruit Crop) रोपे आणली होती. या वनस्पतीला पिटाया असेही म्हणतात.

अतुलने सांगितले की, त्यांच्या कुटुंबाची 7 एकर जमीन नापीक आहे. यामुळे ड्रॅगन फळ हंगामात घेतले जाते. ड्रॅगन फ्रूटच्या मोठ्या प्रमाणावर लागवडीसाठी (Dragon Fruit Farming) तीन पुरुष आणि एका महिलेला देखील कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबाच्या दुसर्या शेतात गहू पिकतो. पण गव्हाच्या शेतीसाठी उत्पादन खर्च अधिक आणि उत्पन्न देखील कमी आहे.

मात्र ड्रॅगन फ्रुटच्या शेतीतून सुरुवातीला थोडा अधिक खर्च करावा लागला तरी देखील नंतर उत्पन्न भरघोस मिळते. अतुल यांनादेखील ड्रॅगन फ्रुट शेतीतुन चांगली कमाई होत आहे. या नयुवकाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. नापीक जमीन सुपीक बनवून त्यातून लाखोंची कमाई अतुल करत असल्याने सध्या अतुल प्रकाशझोतात आले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe