Successful Farmer: पाटलांचा नांद नाही करायचा…! पाटलांनी केळीचे एकरी 35 टन उत्पादन घेतलं, केळी केली सौदी अरेबियाला निर्यात

Ajay Patil
Published:

Successful Farmer: शेतीमध्ये (Farming) इतर व्यवसायाप्रमाणे बदल घडवून आणणे अतिशय महत्त्वाचे असते. काळाच्या ओघात शेतीत (Agriculture) बदल केला तर निश्चितच शेतकरी बांधवांना (Farmer) यातून चांगले उत्पन्न (Farmer Income) मिळवता येते.

उस्मानाबाद जिल्ह्यातील (Osmanabad News) एका शेतकऱ्याने देखील काळाच्या ओघात बदल करत शेती व्यवसायातून लाखो रुपये उत्पन्न कमावण्याची किमया साधली आहे. खरं पाहता, उस्मानाबाद जिल्हा कायमच चर्चेत असतो.

कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी तर कधी उन्हाचा तडाका त्यामुळे उस्मानाबाद जिल्हा संपूर्ण राज्यात कायम चर्चेचा विषय ठरत असतो. जिल्ह्यातील शेतकरी बांधव नेहमीचं शेतीत नवनवीन प्रयोग करत असतात. शेतकऱ्यांचे हे प्रयोग शेतकऱ्यांसाठी विशेष फायदेशीर देखील ठरत असतात.

तुळजापूर तालुक्यातील मौजे चिवरी येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील आधुनिक पद्धतीने केळीची लागवड (Banana Farming) केली आहे. पोपटराव पाटील नामक प्रयोगशील शेतकऱ्याने केळीच्या लागवडीतून एकरी 35 टन एवढे दर्जेदार उत्पादन मिळवून दाखवले आहे शिवाय पोपटराव यांची खेळी सौदी अरेबियात निर्यात करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या पंचक्रोशीत पोपटराव पाटलांचे नाव चांगलेच गाजत आहे. केळीच्या शेतीतून लाखों रुपयांचे उत्पन्न कमवून पोपटराव पाटलांनी इतर शेतकऱ्यांसाठी एक आदर्श रोगाला आहे.

खरं पाहता पोपटराव पाटील हे परिवहन खात्यात कामाला होते. सरकारी नोकरदार असतानादेखील शेती वरील त्यांचे प्रेम काही कमी झाले नाही. यामुळे रिटायर झाल्यानंतर पोपटराव पाटलांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने पाटलांनी वर्षापूर्वी आपल्या पाच एकर शेत जमिनीत केळीची लागवड केली.

लागवड केल्यानंतर पाटलांनी योग्य ते खत व्यवस्थापन व पाणी व्यवस्थापन करून केळीचे दर्जेदार उत्पादन मिळवले आहे. पाटलांनी अगदी मशागतीपासून ते काढणीपर्यंत बारीक लक्ष देऊन केळीचे यशस्वी शेती केली आहे. केळीच्या शेतीतून 35 टन एकरी उत्पादन मिळाले असून त्यांच्या केळीला दोन हजार रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला आहे.

कौतुकास्पद बाब म्हणजे पाटलांनी उत्पादित केलेली केळी चक्क सौदी अरेबियाला निर्यात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पाटलांनी या आधी द्राक्षशेतीत देखील चांगले दर्जेदार उत्पादन मिळवून दाखवले आहे.

काळाच्या ओघात शेतीत बदल करून आधुनिकतेची सांगड घालून लाखो रुपयांचे उत्पन्न सहज मिळवता येते हे पाटील यांनी दाखवून दिले आहे. पाटलांच्या या कौतुकास्पद कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. निश्चितच पाटलांची ही कामगिरी इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणारी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe