Successful Farmer: शेती व्यवसायात (Farming) काळाच्या ओघात बदल घडवून आणला आणि त्याला अपार कष्टाचे सांगड घातले तर शेतीमधून लाखो रुपयांचे उत्पन्न कमावता येते.
कृषी तज्ञ देखील शेतकरी बांधवांना (Farmer) काळाच्या ओघात शेतीत बदल करण्याचा सल्ला देतात. कृषी तज्ञांच्या मते शेतकरी बांधवांनी आता बाजारपेठेत ज्या पिकांची मागणी असते त्याच पिकांची शेती केली पाहिजे.
बाजारात जे विकते तेच जर पिकवले तर निश्चितच शेतकऱ्यांना लाखों रुपयांचा नफा (Farmers Income) मिळू शकतो. पुणे जिल्ह्यातील (Pune) बारामती तालुक्याच्या (Baramati) एका अवलिया शेतकऱ्याने देखील हे सिद्ध करून दाखवले आहे.
तालुक्याच्या कोर्हाळे बुद्रुक येथील अजित पोमणे नामक तरुण शेतकऱ्याने बाजारात जे विकते ते पिकवले आणि लाखों रुपये उत्पन्न कमावण्याची किमया साधली आहे.
मित्रांनो अजितराव गेल्या अनेक वर्षांपासून शेतीमध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग राबवित आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून कलिंगड या हंगामी पिकांची शेती करत आहेत. दरवर्षी अजित राव यांना कलिंगड शेतीतून सुमारे चार लाख रुपयांचा नफा मिळत आहे.
यावर्षी देखील त्यांना कलिंगड पिकातून चांगला बक्कळ नफा मिळाला आहे. यावर्षी जवळपास सव्वातीन लाख रुपये कलिंगड पिकातून त्यांना नफा मिळाला आहे.
गत वर्षी ऊस रोपं विक्री करून जवळपास साडे चार लाख आणि भाजीपाला रोपातून त्यांना 6 लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. म्हणजेच एकूण साडे दहा लाख रुपये उत्पन्न मिळाले यात खर्च वजा जाता चार लाख रुपये निव्वळ नफा त्यांना राहिला.
अजित राव यांनी उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने सिद्धिविनायक हायटेक नर्सरी नामक रोपवाटिकेची उभारणी केली आहे. ते आपल्या रोपवाटिकेत चांगल्या दर्जाची भाजीपाला तसेच फळ रोपे परिसरातील शेतकऱ्यांना पुरवत आहेत.
नर्सरी ची उभारणी करून अजित राव यांनी उत्पन्न वाढवले शिवाय उन्हाळ्यात कलिंगडे हंगामी पिकांची लागवड करून ते चांगला नफा कमवत आहेत.2012 मध्ये अजितराव यांनी पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत नगदी पिकांची (Cash Crop) शेती करण्यास सुरुवात केली.
यामध्ये उस कलिंगड कांदा वांगी टोमॅटो इत्यादी पिकांचा समावेश त्यांनी केला. यामध्ये चांगले यश मिळाल्यानंतर त्यांनी 2014 साली पोल्ट्री फार्म सुरू केला. 3 हजार कोंबड्याचे दोन पोल्ट्री त्यांनी त्यावेळी उभारले.
अजितरावं यांनी दरवर्षी ऊस 10 एकर, कलिंगड 1 एकर, वांगी 1 एकर, बटाटा 1 एकर व आले 1 एकर अशी लागवड केली. मात्र भाजीपाला लागवडीसाठी रोपखरेदीवर मोठ्या प्रमाणावर खर्च होऊ लागल्याने त्यांनी स्वतःची रोपवाटिका उभारण्याचा निर्णय घेतला.
यामुळे त्यांनी रोपवाटिका स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी शासनाकडून अनुदान देखील मिळाले. गत वर्षी एका रोपवाटिकेची स्थापना झाली यावर्षी पुन्हा एक रोपवाटिका त्यांनी स्थापन केली आहे.
निश्चितच अजित राव यांनी शेती व्यवसायात आधुनिकतेची सांगड घालत शेती व्यवसाय हा केवळ तोट्याचा आहे असे म्हणणार्या लोकांना एक दिशा देण्याचे काम केले आहे.